RBI On Kotak Mahindra Bank | ब्रेकिंग: RBI चा कोटक महिंद्राला धक्‍का,’या’ सेवांसाठी नवीन ग्राहकांना प्रवेश न देण्याचे आदेश | पुढारी

RBI On Kotak Mahindra Bank | ब्रेकिंग: RBI चा कोटक महिंद्राला धक्‍का,'या' सेवांसाठी नवीन ग्राहकांना प्रवेश न देण्याचे आदेश

पुढारी ऑनलाईन डेस्क: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज (दि.२४) कोटक महिंद्रा बँक लिमिटेडला मोठा धक्‍का दिला आहे. बँकेला मोबाइल आणि ऑनलाइन बँकिंगद्वारे नवीन ग्राहकांना प्रवेश न देण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत. RBI ने कोटक बँकेला नवीन क्रेडिट कार्ड जारी करणे थांबवण्यास सांगितले आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.  (RBI On Kotak Mahindra Bank)

RBI ने खाजगी क्षेत्रातील मोठी बँक कोटक महिंद्रा बँकेवर कडक कारवाई केली आहे. ऑनलाइन आणि मोबाईल बँकिंगद्वारे नवीन ग्राहक जोडण्यावर आरबीआयने बँकेवर बंदी घातली आहे. बँकेच्या IT नियमांच्या अज्ञानामुळे आरबीआयने ही मोठी कारवाई केली आहे. तथापि, बँकेच्या क्रेडिट कार्ड ग्राहकांसह, विद्यमान ग्राहकांना सेवा प्रदान करणे सुरू ठेवेल, असे देखील RBI ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. (RBI On Kotak Mahindra Bank)

Kotak Mahindra Bank वर का करण्यात आली कारवाई?

आरबीआयला बँकेच्या आयटी प्रणालीमध्ये त्रुटी आढळल्या होत्या. यावर बँकेकडून उत्तरही मागवण्यात आले होते, जे आरबीआयला समाधानकारक वाटले नाही. तसेच कोटक महिंद्राच्या “आयटी इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, पॅच आणि चेंज मॅनेजमेंट, यूजर ऍक्सेस मॅनेजमेंट, व्हेंडर रिस्क मॅनेजमेंट, डेटा सिक्युरिटी आणि डेटा लीक प्रतिबंधक स्ट्रॅटेजी, बिझनेस कंटिन्युटी आणि डिझास्टर रिकव्हरी कठोरता आणि ड्रिल इत्यादी क्षेत्रात गंभीर कमतरता आणि गैरव्यवहार आढळ्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे. त्यामुळे सन 2022 आणि 2023 च्या आयटी तपासणीनंतर आरबीआयने ही कारवाई केली आहे. (RBI On Kotak Mahindra Bank)

नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यावर बंदी

आरबीआयनेही क्रेडिट कार्ड जारी करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन क्रेडिट कार्ड देण्यावर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. परंतु विद्यमान क्रेडिट ग्राहकांसाठी सेवा सुरू राहील.

नवीन ग्राहक जोडण्यावरही बंदी

ऑनलाइन मोडद्वारे नवीन ग्राहक जोडण्यावर बंदी आहे. याशिवाय मोबाईल बँकिंगद्वारे नवीन ग्राहक जोडण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

Back to top button