विमा खरेदीची कमाल वयोमर्यादा हटवली, आयआरडीएने नियमांमध्ये केले महत्वाचे बदल | पुढारी

विमा खरेदीची कमाल वयोमर्यादा हटवली, आयआरडीएने नियमांमध्ये केले महत्वाचे बदल

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : विमा नियामक आयआरडीएने विमा खरेदी करण्याची कमाल वयोमर्यादा ६५ वर्ष हटवण्याचा निर्णय घेतला. विमाधारकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आयआरडीने विमादधारकांना अनूकूल असे बदल केलेत. त्यामध्ये कमाल वयोमर्यादा हटवल्याचा महत्वाचा बदल केला. त्याचबरोबर आधीच अस्तित्वात असलेल्या आजारांच्या विमा संरक्षणासाठी प्रतीक्षा कालावधी देखील कमी करण्यात आला. हे बदल विमाधारकांना फायदेशीर ठरतील.

आरआरडीएने केलेले बदल पुढीलप्रमाणे:

विमा खरेदीची कमाल वयोमर्यादा संपली

आतापर्यंत विमा कंपन्यांना ६५ वर्षांपर्यंतच्या व्यक्तीला नियमित आरोग्य कवच देणे बंधनकारक होते. नियमांमध्ये बदल करून आरोग्य विमा खरेदीसाठी कमाल वयाची अट काढून टाकण्यात आली. यामुळे कंपन्या ज्येष्ठ नागरिकांना लक्षात घेऊन विमा सादर करतील. तसेच नाविन्यपूर्ण विमाधोरण आस्तित्वात येईल.

मधुमेहथायरॉईडहायपरटेन्शनदमा यांसारख्या जुनाट आजारांसाठी विमा संरक्षण

आयआरडीएने आधीपासून अस्तित्वात असलेल्या रोगांच्या (पीईडी) विमा संरक्षणासाठी प्रतिक्षा कालावधी ४ वर्षांवरुन कमाल ३ वर्षांपर्यंत कमी केला. हे विमाधारकांसाठी चांगले पाऊल असेल. याच्या मदतीने मधुमेह, थायरॉईड, हायपरटेन्शन, दमा यांसारख्या जुनाट आजारांसाठी विमा संरक्षण मिळण्यास सुरुवात होईल.

अधिस्थगन कालावधी कमी केला

विमा दाव्यांची स्थगिती कालावधी ८ वर्षांवरून ५ वर्षांपर्यंत कमी करण्यात आली आहे. आता, सतत ६० महिन्यांच्या कव्हरेजनंतर, विमा कंपनी ग्राहकाचा कोणताही दावा गैर-प्रकटीकरण आणि चुकीचे सादरीकरण या कारणास्तव नाकारू शकत नाही. फसवणूक सिद्ध झाल्यासच विमा कंपनी दावा नाकारू शकते. यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा यांसारख्या आजारांची माहिती न दिल्याच्या आधारे कंपन्या दावे फेटाळतात, या गोष्टी कमी होतील. आता सलग ५ वर्षे प्रीमियम भरल्यानंतर कोणताही विमा दावा नाकारला जाणार नाही.

विमा घेण्यापूर्वी 3 गोष्टी लक्षात ठेवा

क्लेम सेटलमेंट: विमा घेण्यापूर्वी, कंपनीच्या क्लेम सेटलमेंटचा ट्रॅक रेकॉर्ड आणि गती तपासा. विम्याच्या अटी आणि शर्ती समजून घ्या आणि जलद क्लेम सेटलमेंटसाठी डिजिटल विमा घ्या.

प्रतिक्षा कालावधी: अनेक विमा कंपन्या एक किंवा दोन वर्षांनी आधीपासून अस्तित्वात असलेल्या आजारांना कव्हर करतात, तर काही कंपन्या फक्त तीन वर्षांनी त्यांना कव्हर करतात. कमी कालावधी असलेली पॉलिसी निवडा.

या गोष्टींचा करा समावेश: विम्यामध्ये कुटुंबातील सदस्य, गंभीर आजार आणि टेलीमेडिसिन, होमकेअर यांसारख्या नवीन सेवांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे.

विमा नूतनीकरण करताना हे लक्षात ठेवा

नूतनीकरणाची वेळ: विद्यमान विमा नूतनीकरणासाठी सामान्यतः 30-दिवसांचा वाढीव कालावधी असतो.

विम्याची रक्कम: पॉलिसीचे नूतनीकरण करण्यापूर्वी तुम्ही विम्याची रक्कम वाढवू शकता. टॉप-अप किंवा सुपर टॉप-अप योजना बेस विम्यामध्ये जोडल्या जाऊ शकतात.

नवीन सदस्य जोडा: विद्यमान विम्यामध्ये नवीन कुटुंब सदस्य जोडता येतो.

पोर्टेबिलिटी: तुम्ही सध्याचा विमा किंवा कंपनीबद्दल समाधानी नसल्यास, तुम्ही विमा पोर्टेबिलिटीची निवड करू शकता.

Back to top button