दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित राजधानी | पुढारी

दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित राजधानी

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – सातत्याने चौथ्यांदा जगातील सर्वात प्रदूषित राजधानी दिल्लीचे नाव पुढे आले आहे. संपूर्ण जगामध्ये दिल्ली सर्वात प्रदूषित राजधानींच्या यादीत समाविष्ट झाली आहे. तर शहरांच्या यादीत बिहार बेगूसराय समोर आले आहे. जगभरातील प्रदूषणवर लेटेस्ट रिपोर्ट समोर आले आहेत. यामध्ये दिल्ली सर्वात खराब वायू गुणवत्ता असणाऱ्या राजधानीच्या रूपात समोर आली आहे. तर बिहारचे बेगुसराय जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून समोर आले आहे. स्विस कंपनी आयक्यू एयर द्वारे विश्व वायु गुणवत्ता रिपोर्ट २०२३ जारी करण्यात आले आहे. २०२२ च्या तुलनेत भारतात प्रदूषण वाढले आहे. यादीमध्ये भारत आठव्या स्थानावरून प्रदूषण यादित तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे.

२०२३ च्या प्रदूषण रिपोर्टमध्ये १३४ देशांसोबत ७,८१२ क्षेत्र आणि प्रदेश समाविष्ट आहे. २०२२ मध्ये याची संख्या १३१ देश आणि ७,३२३ क्षेत्र आणि प्रदेश होती. त्याचे आकडे रिपोर्टमध्ये समाविष्ट झाले होते. त्यामध्ये जगामध्ये प्रत्येक ९ मृत्यूंपैकी एक मृत्यू वायू प्रदूषणाने होतो. वायु प्रदूषण मानवी आरोग्यासाठी सर्वात मोठा पर्यावरणीय धोका आहे.

डब्ल्यूएचओनुसार, वायु प्रदूषण प्रत्येक वर्षी जगभरात अनुमानित सात दशलक्ष अकाली मृत्यूसाठी जबाबदार ठरते. वायु प्रदुषणामुळे दमा, कॅन्सर, स्ट्रोक आणि फुफ्फुसाचे अनेक गंभीर आजार होण्याचा धोका संभवतो. आयक्यू एयरने म्हटलं आहे की, हा रिपोर्ट बनवण्यासाठी उपयोग करण्यात आलेला डेटा ३० हजारहून अधिक नियामक वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्रे आणि संशोधन संस्था, सरकारी संस्था, विद्यापीठे आणि शैक्षणिक सुविधा, ना-नफा संस्था, खासगी कंपन्या आणि शास्त्रज्ञांद्वारे एकत्रित करण्यात आले होते.

IQ Air ने तयार केलेल्या जागतिक वायु गुणवत्ता निर्देशांक अहवाल २०२३ नुसार, सरासरी वार्षिक PM २.५ concentrationsच्या आधारे भारत २०२३ मध्ये तिसरा क्रमांकावर होता. तर बांगलादेश पहिल्या आणि पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर आहे. २०२२ मध्ये, भारत हा आठव्या क्रमांकाचा प्रदूषित देश म्हणून समोर आला आहे, ज्याची सरासरी PM२.५ concentrations ५३.३ मायक्रोग्राम प्रति घनमीटर आहे. याचाच अर्थ आता देशात प्रदूषण आणखी वाढले आहे.

Back to top button