CJI n v ramana : न्यायमूर्तींवर केवळ शारीरिकच नव्हे तर सोशल मीडियातूनही हल्ले होतात

नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन
सर्वोच्च न्यायालयात संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माझ्या एक एक वाक्याची मीडियावाले बातम्या बनवत असतात. ७२ वर्षांपूर्वी आम्ही संविधान हातात घेतले. ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण केले त्यांना मी आदरांजली वाहतो. तसेच ज्यांनी हे संविधानाची निर्मिती केली त्यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करत असल्याचे ते म्हणाले. २० व्या शतकातील एक अद्भुत दस्तऐवज म्हणून संविधानाचा आपण वापर करत आहे. (CJI n v ramana)
न्यायाधीशांवरील हल्ल्याबाबत बोलताना रमण्णा म्हणाले की, न्यायाधीशांवर वारंवार हल्ले होत आहेत. केवळ शारीरिकच नव्हे, तर सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांच्यावर टीक टिप्पणी केली जात आहे.
याबाबत अधिकाऱ्यांनी पुढे येऊन न्यायाधीशांना मदत करावी.
cji n v ramana : केंद्र सरकारकडून सहकार्याची अपेक्षा
सर्वोच्च न्यायालयाची अंतर्गत रचना सुधारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समित्यांचा विचार पंतप्रधानांनी करावा.
तसेच सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी कॉलेजियम चांगले काम करत आहे. यासाठी केंद्र सरकारकडून सहकार्याची अपेक्षा आहे.
सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा म्हणाले की, न्याय देणे हे केवळ न्यायपालिकेचे काम आहे, असा सर्वसाधारण समज आहे, तो बरोबर नाही, ते तीन गोष्टींवर अवलंबून आहे.
कायदेमंडळ आणि कार्यकारिणीचे कोणतेही दुर्लक्षीत घटमुळे न्यायव्यवस्थेवर भर पडतो.
काही वेळा न्यायपालिका केवळ कार्यपालिकेला धक्का देते. पण त्याची जागा तुम्ही घेणे चुकीचे आहे.
१५ डिसेंबरपासून सुरु होणार आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होणार https://t.co/0OtrEv59K7 #internationalairservice
— Pudhari (@pudharionline) November 26, 2021
कायदा तोडणारे कायदे करणारे नसावेत
यावेळी एससीबीएचे अध्यक्ष विकास सिंह म्हणाले, कायदा तोडणारे कायदे करणारे नसावेत. आज आपण याचा विचार केला पाहिजे.
२००४ मध्ये फौजदारी खटले असणारे लोक कायदा निर्माण करण्यासाठी फक्त २३% होते, आता ते ४३% झाले आहे, आपण त्याचा विचार करायला हवा. असे सिंह म्हणाले.
तुषार मेहता म्हणाले, आम्ही संविधान दिन साजरा करत आहोत.
पण जोपर्यंत आपल्या जीवनात सामान्यता आहे, तोपर्यंत आपल्याला सशक्त संविधानाची गरज भासत नाही.
पण ज्यावेळी आपण कायद्याच्या कचाट्यात सापडतो त्यावेळी संविधान आणि कायदा काय याची माहिती होते. असे मेहता म्हणाले.