हरदा दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ४ लाखांची मदत : मुख्यमंत्री | पुढारी

हरदा दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ४ लाखांची मदत : मुख्यमंत्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशमधील हरदा येथील फटाक्यांच्या कारखान्याला आज (दि.६) सकाळी भीषण आग लागली. या दुर्घटनेत ६ जण ठार झाले आहेत. तर ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांच्या वारसांना तत्काळ ४ लाखांची मदत देण्यात येणार आहे. तर जखमींवर मोफत उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली.

मुख्यमंत्री म्हणाले की, या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. आणि ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ५० हून अधिक रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. मंत्री रणवेंद्र प्रताप सिंह, डीजी गृह आणि जवळपास ४०० पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. आम्ही आगीवर नियंत्रण मिळवण्याचा आणि जखमींना तातडीने मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपये देण्यात येणार आहेत. तर जखमींवर मोफत उपचार केले जातील, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button