Varanasi : धक्कादायक! ‘त्या’ झोपत होत्या आईच्या मृतदेहासोबत | पुढारी

Varanasi : धक्कादायक! 'त्या' झोपत होत्या आईच्या मृतदेहासोबत

वाराणसी : आईच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहासह वर्षभरापासून दोन्ही मुली झोपत होत्या. अलीकडे शेजाऱ्यांना शंका आली आणि पोलिस दाखल झाले तेव्हा आईचा सांगाडा तेवढा उरलेला होता. त्यालाच बिलगडून मुली रडू लागल्या. आईला नेऊ नका म्हणून पोलिसांना विनवू लागल्या, उषा त्रिपाठी (वय ५२) असे मृत महिलेचे नाव असून, पल्लवी (२७) आणि वैश्विका (१८) अशी मुलींची नावे आहेत. घाट बदरवा येथील उषा यांचे पती दोन वर्षांपूर्वी घर सोडून निघून गेले होते. आईच्या मृत्यूनंतर नातेवाईक आले तेव्हा आईचा अंत्यसंस्कार
आटोपल्याचे या मुलींनी सांगितले होते. (Varanasi)

हेही वाचा 

Back to top button