अपघात झाला अन् कारमधील दारूच्या बाटल्या पळवण्यासाठी उडाली झुंबड | पुढारी

अपघात झाला अन् कारमधील दारूच्या बाटल्या पळवण्यासाठी उडाली झुंबड

पुढारी ऑनलाईन : कुणाच्या संकटात कुणाचा फायदा होईल सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार घडला आहे बिहारमध्ये. बिहारमधील सिवान इथे एक कार अॅक्सिडेंट झाला. पण या अपघातानंतर मात्र लोकांनी जवळपास दिवाळीच साजरी केली आहे. विशेष म्हणजे याचा व्हीडीयोही व्हायरल होतो आहे. या व्हिडियोमध्ये अपघातग्रस्त कारमधून लोक दारूच्या बाटल्या चोरून नेताना दिसत आहेत. अपघातानंतर काही वेळातच गाडीचा चालक गाडीतून उतरला आणि अटकेच्या भीतीने तेथून पळून गेला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बिहारमध्ये २०१६ पासून दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

यापूर्वीच नितीश कुमार यांनी बिहारमध्ये होत असलेल्या दारू तस्करीबाबत शोध घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी राज्यात दारूचा पुरवठा रोखण्यावर लक्ष केंद्रित करून दारूबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. तरीही दारू दिसताच लोकांनी कारच्या केलेल्या अवस्थेचा व्हिडियो व्हायरल होतो आहे.

Back to top button