The Vaccine War : पीएम मोदींकडून द वॅक्सीन वॉरचे कौतुक, ‘शास्त्रज्ञांचे गौरवास्पद काम’ | पुढारी

The Vaccine War : पीएम मोदींकडून द वॅक्सीन वॉरचे कौतुक, 'शास्त्रज्ञांचे गौरवास्पद काम'

पुढारी ऑनलाईन डेस्क : विवेक अग्निहोत्री यांचा ‘द वॅक्सीन वॉर’ चित्रपटाची चर्चा होत आहे. त्यांचा हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज झालाय. पण, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास जादू दाखवू शकला नाही. ‘द वॅक्सीन वॉर’ (The Vaccine War) चित्रपटाला विवेक अग्निहोत्रीने प्रमोटदेखील केलं होतं. प्रमोशन करून देखील चित्रपट बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा चालला नाही. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द वॅक्सीन वॉरचे कौतुक केले आहे. (The Vaccine War)

संबंधित बातम्या –

अलीकडेच, राजस्थानमधील जोधपूर येथे एका रॅलीदरम्यान पीएम मोदींनी ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाचा उल्लेख केला. ते म्हणाले, ‘मी ऐकले आहे की, ‘द वॅक्सिन वॉर’ हा चित्रपट आला आहे. आपल्या देशातील वैज्ञानिकांनी कोविडशी लढण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेतले ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्या प्रयोगशाळेत ऋषींच्या सारखे ध्यान…आपल्या महिला शास्त्रज्ञांनीही अप्रतिम काम केले. त्या सर्व गोष्टी ‘द वॅक्सिन वॉर’ मध्ये दाखवल्या आहेत. तो चित्रपट पाहिल्यानंतर मला अभिमान वाटतो की आपल्या शास्त्रज्ञांनी असे काम केले आहे.

‘द वॅक्सीन वॉर’ चित्रपट २८ सप्टेंबर रिलीज झाला होता. ऑगस्टमध्ये, निर्मात्यांनी इंडिया फॉर ह्यूमॅनिटी टूर अंतर्गत अमेरिकेत द वॅक्सीन वॉरचे विशेष स्क्रीनिंग आयोजित केले होते.

Back to top button