Sikkim : सिक्कीममध्ये ढगफुटी; लष्कराचे २३ जवान बेपत्ता | पुढारी

Sikkim : सिक्कीममध्ये ढगफुटी; लष्कराचे २३ जवान बेपत्ता

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर सिक्कीममधील लोनाक सरोवरावर य़ेथे  ढग फुटी झाली आहे. त्यामुळे लाचेन खोऱ्यातील तीस्ता नदीला अचानक पूर आला. पुरात लष्कराचे २३ जवान बेपत्ता तर काही वाहने गाळाखाली दबल्याची माहिती समोर आली आहे. बेपत्ता जवानांचे शोध मोहीम सुरू आहे. गुवाहाटी संरक्षण पीआरओ यांनी माहीती दिली आहे.   (Sikkim)

Sikkim : लष्कराचे २३ जवान बेपत्ता

उत्तर सिक्कीममधील ल्होनाक सरोवरावर येथे अचानक ढगफुटीमुळे बुधवारी (दि.३) रात्री पूर आला. ज्यामुळे तीस्तामधील पाण्याची पातळी अचानक वाढली. चुंगथांग धरणातून पाणी सोडण्यात आल्याने परिस्थिती आणखीनच बिकट झाली. त्यामुळे पाण्याची पातळी १५-२० फूट उंच झाली आहे. लाचेन खोऱ्यातील तिस्ता नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे लष्कराचे २३ जवान बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

राज्यात हाय अलर्ट जारी

सिंगतामजवळील बारडांग येथे उभी असलेली लष्कराची वाहने पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. बेपत्ता जवानांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. अचानक आलेल्या पुरामुळे लाचेन खोऱ्यातील अनेक लष्करी आस्थापनांचेही नुकसान झाले आहे. संपूर्ण नुकसानीचा अंदाज घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तीस्ता नदीवरील सिंगथम फूट पुल ओसंडून वाहणाऱ्या नदीमुळे कोसळला. पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नदीच्या खालच्या पाणलोट क्षेत्रातून लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. सिक्कीम सरकारने राज्यात हाय अलर्ट जारी केला असून लोकांना तीस्ता नदीपासून दूर राहण्यास सांगितले आहे.

Back to top button