Mohammed Zubair : अल्ट न्यूजच्या सहसंस्थापकावर गुन्हा; जाणून घ्या काय आहे प्रकरण | पुढारी

Mohammed Zubair : अल्ट न्यूजच्या सहसंस्थापकावर गुन्हा; जाणून घ्या काय आहे प्रकरण

पुढारी ऑनलाईन: उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील एका शाळेतील विद्यार्थ्याला थप्पड मारल्याप्रकरणी अल्ट न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद झुबेर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित पीडित विद्यार्थ्याची ओळख उघड केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तर मुलांचे संरक्षण आणि काळजी कायद्याच्या कलम 74 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णुदत्त नावाच्या व्यक्तीच्या तक्रारीवरून मनसुपूर पोलिस ठाण्यात झुबेरविरुद्ध हा गुन्हा दाखल (Mohammed Zubair) करण्यात आला आहे.

विष्णुदत्त यांनी Alt न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद जुबेर यांच्यावर एका मुस्लिम मुलाला शाळेत मारहाण केल्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये पीडित विद्यार्थ्याची ओळख उघड केल्याचा आरोप केला आहे. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, ‘ओळख उघड करून बाल न्याय कायद्यांतर्गत मुलाच्या हक्कांचे उल्लंघन (Mohammed Zubair) केले गेले आहे’.

माध्यमांसह इतर अनेकांनी हा व्हिडिओ पोस्ट केला असला तरीही एफआयआरमध्ये मी एकटाच आहे, असे झुबेर याने माध्यमांशी बोलताना (Mohammed Zubair) म्हटले आहे.

काय आहे प्रकरण ?

मुझफ्फरनगरमधील एका खासगी शाळेतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एक महिला शिक्षिका कथितरित्या इतर विद्यार्थ्यांना मुस्लिम विद्यार्थ्याला थप्पड मारण्यास सांगत असल्याचे दाखवण्यात आले होते. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले. यानंतर येथील विरोधी राजकीय पक्षांनी योगी सरकारला घेरले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही भाजपवर निशाणा साधला. त्याचवेळी, या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ मोहम्मद झुबेरने देखील सोशल मीडिया साइट X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केला. त्यानंतर त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Scroll.in (@scroll_in)

हेही वाचा:

Back to top button