‘काशी विश्वनाथ’बद्दल कोर्टाबाहेर तडजोड अशक्य; समेटाची भाषा हिंदूंशी गद्दारी’ – हिंदू पक्षाचे वकील | पुढारी

'काशी विश्वनाथ'बद्दल कोर्टाबाहेर तडजोड अशक्य; समेटाची भाषा हिंदूंशी गद्दारी' - हिंदू पक्षाचे वकील

Gyanvapi : 'मंदिराच्या जागेबद्दल एक इंचही तडजोड नाही'

पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्ञानवापी (Gyanvapi) आणि काशी विश्वनाथ मंदिर या वादात कोणताही तडजोड केली जाणार नाही. मंदिराच्या एक इंचही जागेबद्दल समेट होऊ शकत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन हिंदू पक्षाचे वकील हरीशंकर जैन यांनी केले आहे. वैदिक सनातन संघ आणि मुस्लिम पक्ष यांच्यात ज्ञानवापीच्या वादाबद्दल समझोता सुरू चर्चांवर त्यांनीही हे स्पष्टीकरण दिले आहे. जो हिंदू पक्ष या संदर्भात तडजोडीची भाषा करत असेल, तो हिंदूचा गद्दार मानला जाईल, असेही त्यांनी सुनावले आहे.

जैन म्हणाले, “जे तडजोडीची भाषा करत आहेत, त्यांच्यापासून हिंदूंनी दूर राहिले पाहिजे. ज्ञानवापीचा विषय न्यायप्रविष्ठ असून कोर्टाच्या आदेशानुसार पुरातत्त्व खाते या परिसरात सर्व्हेक्षण करत आहे.” या प्रकरणात एकूण ६ खटले दाखल झाले आहेत, याशिवाय भारतात

ज्या-ज्या ठिकाणी मंदिरांची मोडतोड करून मशिदी बांधल्या आहेत, त्या सर्वच ठिकाणी कायदेशीर लढा दिला जाईल.
ते म्हणाले, “काशी विश्वनाथच्या जागेबद्दल एक इंचही तडजोड केली जाणार नाही. जे तडजोड करून हा वाद मिटवू इच्छित आहेत, ते हिंदूंना धोका देत आहेत.”

हेही वाचा

Back to top button