Gyanvapi : ‘ज्ञानवापी’ आहे बौध्द विहार ; बौद्ध भंतेची सर्वोच्च न्यायलयात रिट याचिका | पुढारी

Gyanvapi : 'ज्ञानवापी' आहे बौध्द विहार ; बौद्ध भंतेची सर्वोच्च न्यायलयात रिट याचिका

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : बौद्ध भंते सुमित रजत यांनी ज्ञानवापी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक रिट याचिका दाखल करीत ते मंदिर अथवा मशीद नसून बौद्ध विहार असल्याचा दावा केला आहे. देशातील अनेक मंदिर बौध्द विहारांना तोडून उभारण्यात आली आहेत, असा दावा देखील त्यांनी केला आहे. ज्ञानवापीत आढलेले त्रिशूळ आणि स्वस्तिक चिन्ह बौध्द धर्माचे आहेत. केदारनाथ अथवा ज्ञानवापी हे जोतिर्लिंग नसून बौद्ध स्तूप आहेत, असा दावा ही याचिकाकर्त्यांने केला आहे. (Gyanvapi)

भंते रजत यांनी देशातील बौध्द विहारांचा शोध सुरु केला आहे. जैन आणि बौध्द विहारांना तोडून तिथे मंदिर तसेच इतर धार्मिक स्थळ बनवण्यात आले आहेत. अशा ठिकाणांचा शोध सुरु करण्यात आल्याचे याचिकाकर्त्याकडून सांगण्यात आले आहे. केदारनाथ, बद्रिनाथसह इतर मंदिरांसंबंधी देखील याचिका दाखल करू, असे याचिकाकर्त्याकडून सांगण्यात आले आहे. (Gyanvapi)

बौद्ध धर्म सर्वात जुना धर्म आहे. भारतीय पुरातत्व विभागाने ज्ञानवापीचे योग्यरित्या सर्वेक्षण केले तर तेथे बौध्द विहाराच आढळून येईल. असे झाल्यास ज्ञानवापी बौद्ध धर्माकडे सुपूर्द करण्यात यावे, अशी मागणी भंते रजत यांनी केली आहे.

हेही वाचा;

Back to top button