Stock Market Updates | ३ दिवसांच्या विक्रीच्या माऱ्यानंतर शेअर बाजार सावरला, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला | पुढारी

Stock Market Updates | ३ दिवसांच्या विक्रीच्या माऱ्यानंतर शेअर बाजार सावरला, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला

पुढारी ऑनलाईन : तीन दिवसांच्या विक्रीच्या माऱ्यानंतर आज शुक्रवारी शेअर बाजार सावरला. आशियातील सकारात्मक संकेतांचा मागोवा घेत भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीने आज तेजीत सुरुवात केली. गेल्या दिवसांत सेन्सेक्स १५०० अंकांहून अधिक खाली आला होता. आज सुरुवातीच्या व्यवहारात तो ३०० हून अधिक अंकांनी वाढून ६५,५७२ वर पोहोचला. तर निफ्टी १९, ४७७ वर व्यवहार करत आहे. आज सुरुवातीला बाजारात चौफेर खरेदी दिसून आली. ‍विशेषतः मेटल, एफएमसीजी आणि ऑटो स्टॉक्समध्ये यात आघाडीवर आहेत. (Stock Market Updates)

सेन्सेक्सवर विप्रो, एचसीएल टेक, टीसीएस, टेक महिंद्रा, इन्फोसिस, टायटन, एलटी, भारती एअरटेल हे शेअर्स वाढले आहेत. पॉवर ग्रिड, बजाज फिनसर्व्ह, हिंदुस्तान युनिलिव्हर यात घसरण दिसून आली.

ऑनलाइन फूड डिलिव्हरी एग्रीगेटर झोमॅटो (Zomato) चा शेअर आज १० टक्क्यांनी वाढून ९५ रुपयांवर पोहोचला. हा शेअर आज ५२ आठवड्यांच्या नवीन उच्चांकावर गेला. झोमॅटोने या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत २ कोटींचा नफा नोंदवला. तर त्यांचा महसूल १,४१४ कोटींवरून २,४१६ कोटी रुपयांवर पोहोचला. झोमॅटोने तोट्यातून बाहेर पडत नफा कमावला आहे. या पार्श्वभूमीवर झोमॅटोचे शेअर्स वधारले आहेत. दरम्यान, जून तिमाहीच्या नफ्यात ५० टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवल्यानंतर आयशर मोटर्सचे शेअर्स ३ टक्क्यांनी वधारले. (Stock Market Updates)

 हे ही वाचा :

Back to top button