मणिपूरमधील घटनेची प. बंगालमध्ये पुनरावृत्ती; अर्धनग्न करुन महिलांना मारहाण | पुढारी

मणिपूरमधील घटनेची प. बंगालमध्ये पुनरावृत्ती; अर्धनग्न करुन महिलांना मारहाण

पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूरमध्ये महिलांना विवस्त्र करुन धिंड काढल्याची घटना ताजी असतानाच आता पश्चिम बंगालमध्ये असाच प्रकार समोर आला आहे. पश्चिम बंगालमध्ये महिलांना विवस्त्र करुन मारहाण केल्‍याचा प्रकार घडला आहे. पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात दोन महिलांना विवस्त्र करुन मारहाण करण्यात आल्याचा दावा भाजपचे आयटीसेल प्रमुख अमित मालवीय यांनी आज (दि.२२) केला आहे. या बाबत त्यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. (Repeat of the Manipur incident in West Bengal)

मालवीय यांचा तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल

मालवीय यांनी या प्रकरणी ट्वीट करत म्हटलं आहे की,  “पश्चिम बंगालमध्ये दहशत सुरु आहे. मालदातील बामनगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन महिलांना विवस्त्र करुन मारहाण करण्यात आली. या वेळी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. ही घटना १९ जुलै रोजी घडली होती.” असा आरोप अमित मालवीय यांनी केला आहे. (Repeat of the Manipur incident in West Bengal)

या प्रकरणी पाेलिसांनी सांगितले की,  ही घटना घडली त्यादिवशी संबंधित महिला मालदा येथील बाजारात सामान विक्रीसाठी गेल्या होत्या. या वेळी काही लोकांनी या महिलांनी चोरी केल्याचा संशय व्यक्त केला. यानंतर काही महिलांनी दोन महिलांना विवस्त्र करुन मारहाण केली आहे.  याबाबत बोलताना पश्चिम बंगाल राज्याच्या महिला व बालविकास शशी पांजा म्हणाल्या, “संबंधित ठिकाणी महिला आपआपसांत भांडत होत्या. पोलीसांनी या वेळी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर त्या महिला तिथून निघून गेल्या होत्या.” (Repeat of the Manipur incident in West Bengal)

 

हेही वाचलंत का?

Back to top button