Yasin Malik : यासीन मलिकला न्यायालयात निष्काळजीपणे नेल्याप्रकरणी 4 अधिका-यांचे निलंबन | पुढारी

Yasin Malik : यासीन मलिकला न्यायालयात निष्काळजीपणे नेल्याप्रकरणी 4 अधिका-यांचे निलंबन

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दहशतवादी फंडिंग प्रकरणातील दोषी आणि जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (जेकेएलएफ)चा प्रमुख यासिन मलिकला (Yasin Malik) शुक्रवारी निष्काळजीपणाने सर्वोच्च न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणात आता तिहार तुरुंग प्रशासनाने कडक कारवाई करत चार अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये एक उपअधीक्षक, दोन सहाय्यक अधीक्षक आणि अन्य एका कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Back to top button