२८९ कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणी बांधकाम कंपनीच्या प्रमुखाला सीबीआयकडून अटक | पुढारी

२८९ कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणी बांधकाम कंपनीच्या प्रमुखाला सीबीआयकडून अटक

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : तब्बल 289 कोटी रुपयांच्या बँक घोटाळा प्रकरणी तिरुपती इन्फ्राप्रोजेक्टस कंपनीचे सर्वेसर्वा जगनमोहन गर्ग यांना सीबीआयने अटक केली आहे. बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा तसेच युको बँक या बँकांच्या समुहाची गर्ग यांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे.
तिरुपती इन्फ्राप्रोजेक्टस ही दिल्लीस्थित बांधकाम कंपनी आहे. घोटाळ्याच्या अनुषंगाने सीबीआयने गर्ग यांच्यासह कंपनीच्या इतर संचालक व जामीनदारांविरोधात मे 2022 मध्ये गुन्हा दाखल केला होता. वर्ष 2009 ते 2014 या कालावधीत बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँकिंग समूहाने हॉटेल बांधण्यासाठी तिरुपती इन्फ्राप्रोजेक्टसला तीनशे कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. दिल्लीतील पश्चिम विहार येथे हे हॉटेल बांधण्यात येणार होते. बँकांना अंधारात ठेवून गर्ग व त्यांच्या सहकाऱ्यांनी हॉटेलमधील गाळे, रिटेल जागा, ऑफिस कार्यालये परस्पर विकल्याचा गुन्हा तपासात उघड झाला होता. त्यानंतर सीबीआयने गर्ग यांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. गर्ग यांना आता अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांची 17 जुलै पर्यंत कोठडीत रवानगी केली आहे.

Back to top button