जगन्‍नाथ रथयात्रेला प्रारंभ, राष्‍ट्रपतींनी दिल्‍या शुभेच्‍छा | पुढारी

जगन्‍नाथ रथयात्रेला प्रारंभ, राष्‍ट्रपतींनी दिल्‍या शुभेच्‍छा

नवी दिल्‍ली; पुढारी ऑनलाईन : ओडिशातील पुरी आणि गुजरातमधील अहमदाबादमध्‍ये जगन्‍नाथ रथयात्रा साेहळ्यास प्रारंभ झाला. या निमित्त राष्‍ट्रपती आणि पंतप्रधानांनी देशवासीयांना शुभेच्‍छा दिल्‍या आहेत.

अधिक वाचा 

यंदाही कोरोना संसर्गाच्‍या संकटामुळे ही यात्रा भाविकांविना होत आहे. रथयात्रेमध्‍ये सहभागी होण्‍याची परवानगी केवळ निवडक लोकांनाच देण्‍यात आली आहे. काेराेना प्रतिबंधक नियमांचे पालन करुनच यात्रा हाेणार आहे.

अधिक वाचा 

अहमदाबादमध्‍ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंदिरातील आरती केली. तसेच मंदिर परिसरातील हत्तींना फलाहार दिला. त्‍यांनी ट्‍विटरवरुन आरती करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

यंदा सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या नियमावलीनुसारच यात्रा होणार आहे. ओडिशात संपूर्ण राज्‍यात रथायात्रा काढण्‍यावर बंदी घातली आहे.

मागील वर्षीही नियमांचे पालन करुनच यात्रा झाली होती.आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्‍ह आलेल्‍या चालकांनाच यात्रेत सहभागी होण्‍याची परवानगी देण्‍यात आली आहे, अशी माहिती पुरी जगन्‍नाथ मंदिराचे प्रशासक अजय जेना यांनी दिली.

अधिक वाचा 

सर्वांना निरोगी आरोग्‍य लाभो : राष्‍ट्रपती

भगवान जगन्‍नाथ रथ यात्रेनिमित्त देशवासियांसह ओडिशातील भाविकांना हार्दिक शुभेच्‍छा. भगवान जगन्‍नाथ यांच्‍या आशीर्वादाने सर्व देशवासीयांचे जीवनात सुख समृद्धि आणि निरोगी आरोग्‍य लाभो, अशा शब्‍दात राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासीयांना शुभेच्‍छा दिल्‍या.

रथ यात्रेनिमित्त सर्वांना शुभेच्‍छा. देशवासीयांना स्‍वास्‍थ आणि समृद्धि लाभावी यासाठी प्रार्थना करतो. आम्‍ही भगवान जगन्‍नाथ यांना नमन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्‍हटले आहे.

हेही वाचलं का?

  • व्‍हिडिओ पहा : महाराष्‍ट्राच्‍या प्रबाेधनाच्‍या केंद्रस्‍थानी तुकाराम महाराज हाेते

Back to top button