विकसित देश म्हणजे काय.. भारतासमोरील आव्हाने काय? | पुढारी

विकसित देश म्हणजे काय.. भारतासमोरील आव्हाने काय?

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत आणि नवीन संसद लोकार्पण सोहळ्यातही भारताला पुढच्या 25 वर्षांत विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प सोडलेला आहे. मोदींनी भारताला पाच ट्रिलियन म्हणजेच 5 हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचा संकल्प हाती घेतलेला आहे.

भारत आज कुठे आहे?

  1. सर्वसामान्य आंतरराष्ट्रीय मानदंडांनुसार आजही भारत एक विकसित राष्ट्र नाही. आपण एक विकसनशील राष्ट्र आहोत. म्हणजे विकसित होण्याच्या मार्गावर आहोत.
  2. भारत आज जगातील पहिल्या पाच बलाढ्य अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट झालेला आहे. याउपर विकसित राष्ट्र म्हणवून घेण्यासाठी हे पुरेसे नाही.
  3. आरोग्य, शिक्षण आणि दळणवळणाच्या अत्याधुनिक सुविधा तसेच समृद्ध जनता ही विकसित देशाचे मुख्य निकष आहेत. त्यात आपण सध्या बसत नाही.

विकसित देशाची वैशिष्ट्ये

  • उदंड जीडीपी आणि दरडोई उत्पन्नाचे अधिक प्रमाण
  • मानवी विकास निर्देशांकाची उत्तम स्थिती
  • अर्थव्यवस्थेत उद्योगापेक्षा सेवा क्षेत्राचा अधिक वाटा
  • अद्ययावत पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य सुविधा

भारतासमोरील अडथळे

  • परकीय राजवटींनी केलेल्या लुटीमुळे संपत्तीतील घट
  • सतत लोकसंख्या वाढीमुळे दरडोई उत्पन्नातील घट
  • प्रचंड लोकसंख्येला मूलभूत, पायाभूत सुविधा पुरविणे

Back to top button