पंतप्रधान देशासाठी काम करतात, ते देश नव्हे : अमित शहांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सिब्बलांचा टोला | पुढारी

पंतप्रधान देशासाठी काम करतात, ते देश नव्हे : अमित शहांच्या 'त्या' वक्तव्यावर सिब्बलांचा टोला

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान देशासाठी काम करतात,ते स्वत: देश नाहीत, अशा शब्दात सोमवारी राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावर टीका केली.सरकार देशासाठी काम करते. परंतु,सरकार देश होवू शकत नाही,असा टोला देखील सिब्बल यांनी ट्विटरवरून अमित शहांना लगावला.

रविवारी अहमदाबाद येथे आयोजित एका कार्यक्रमातून अमित शहा यांनी पूर्णेश मोदी यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याचा उल्लेख केला होता.’मोदी’ आडनावाच्या वक्तव्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. कुठल्या व्यक्तीचा अपमान करणे ही मोठी बाब नाही. पंरतु, समाज आणि पंतप्रधानांचा अपमान होत असेल तर ते संपूर्ण देशाचा अपमान करण्यासारखे आहे.
पूर्णेश यांनी संपूर्ण कटिबद्धता,दृढतेने कायदेशीर लढाई लढत ती जिंकली. देश त्यांच्यासोबत असल्याचे शहा यावेळी म्हणाले. त्यांना अभिनंदन देतांना संपूर्ण देश त्यांच्या सोबत असल्याचे शहा म्हणाले होते.

अमित शहांच्‍या या विधानावर राज्यसभा खासदार सिब्बल यांनी टीका केली आहे. मे २०२२ मध्ये कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर सिब्बल समाजावादी पक्षाच्या सहकार्याने राज्यसभेत पोहचले आहेत.

 

Back to top button