Wrestlers Protest : हजारो शेतकऱ्यांची दिल्लीत धडक; आंदोलक कुस्तीपटुंना दिला पाठिंबा | पुढारी

Wrestlers Protest : हजारो शेतकऱ्यांची दिल्लीत धडक; आंदोलक कुस्तीपटुंना दिला पाठिंबा

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : दिल्लीतील जंतरमंतरवर २३ एप्रिलपासून धरणे आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटुंना पाठिंबा देण्यासाठी पंजाबमधील हजारो शेतकऱ्यांनी शनिवारी (दि.८) आंदोलनस्थळी उपस्थिती नोंदवली. संयुक्त किसान मोर्चा (Samyukta Kisan Morcha) या बॅनरखाली एकत्र येत शेतकरी संघटनेच्या एका गटाने आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटुंना पाठिंबा दिला. महिला कुस्तीपटुंचे लैगिंक शोषण केल्याचा आरोप असणाऱ्या खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांना तातडीने अटक करावी या मागणीसाठी देशातील पद्म पुरस्कार प्राप्त आणि ऑलम्पिक मध्ये गौरवास्पद कामगिरी करणारे आघाडीचे महिला व पुरुष कुस्तीपटु आंदोलन करत आहेत. (Wrestlers Protest)

हरियाणातील तरुण शेतकरी नेत्याने सांगितले की, आम्ही ४० शेतकरी संघटनांची ऑनलाईन बैठक घेतली. या मध्ये महिला कुस्तीपटुंवर झालेल्या अन्याया विरुद्ध आणि ते करत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने दिल्लीती आंदोलनस्थळी पोहचण्याचा निर्णय घेण्यात आला व त्या नुसार आम्ही आंदोलन स्थळी दाखल झाल्याची प्रतिक्रीया या शेतकरी नेत्याने दिली. (Wrestlers Protest)

३ मे रोजी धरणे आंदोलन करणाऱ्या महिला व पुरुष कुस्तीपटुंवर पोलिसांनी बळजबळी करत त्यांच्या लाठीचार्ज केला. आंदोलनस्थळाला कडक बॅरेकेटींग तगडा बंदोबस्त करण्यात आला होता. जेव्हा आंदोलक कुस्तीपटुंनी आंदोलन स्थळी फोल्डींगचे कॉट आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांशी या आंदोलकांची झटापट झाली. यावेळी या कुस्तीपटुंना पोलिसांनी मारहाण केली व या ठिकाणी पोलिसांनी माध्यमांना सुद्धा येण्यास बंदी घातली होती.

३ मे च्या घटनेनंतर पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटुंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. यानंतर कुस्तीपटुंना पाठिंबा देण्यासाठी व आंदोलनस्थळी पोहचण्यासाठी पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकऱ्यांनी जंतरमंतर गाठले. यावेळी शेतकऱ्यांच्या नेत्यांनी ३ मे रोजी पोलिसांनी आंदोलकांशी केलेल्या कृत्याचा निषेध नोंदवत आरोपी पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याची व लैगिंक शोषणाच्या प्रकरणात आरोपी असणाऱ्या बृजभूषण सिंह यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.

अधिक वाचा :

Back to top button