मागण्या मान्य झाल्यामुळे कुस्तीपटूंनी तपास पूर्ण होऊ द्यावा: अनुराग ठाकूर | पुढारी

मागण्या मान्य झाल्यामुळे कुस्तीपटूंनी तपास पूर्ण होऊ द्यावा: अनुराग ठाकूर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी मान्य झालेली आहे. त्यामुळे कुस्तीपटूंनी आता तपास पूर्ण होऊ द्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आज (दि. ५) पत्रकारांशी बोलताना केले.

बृजभूषण सिंग यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचा तपास दिल्ली पोलीस करीत आहेत. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने देखील गुन्हा दाखल झाला असल्याचे स्पष्ट केले आहे, असे ठाकूर यांनी नमूद केले. क्रीडा मंत्र्याकडून कोणतीही कारवाई केली जात नसून हे प्रकरण दाबले जात असल्याचा आरोप अलीकडेच कुस्तीपटू विनेश फोगट हिने केला होता. याआधीचे आमचे आंदोलन ठाकूर यांच्यासोबत बैठकीनंतर संपविण्यात आले होते. त्यावेळी सिंग यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन ठाकूर यांनी दिले होते. पण समिती स्थापन करुन त्यांनी लैंगिक अत्याचाराचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, असा आरोप फोगट हिने केला होता. दरम्यान बृजभूषण सिंग यांना जोवर अटक केली जात नाही. तोवर आंदोलन संपविले जाणार नसल्याचा इशारा बजरंग पुनिया, साक्षी मलिकसहित इतर कुस्तीपटूंनी दिला आहे.

हेही वाचा 

Back to top button