सत्तासंघर्षाचा निकाल पुढील आठवड्यात शक्य | पुढारी

सत्तासंघर्षाचा निकाल पुढील आठवड्यात शक्य

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल 8 ते 12 मेदरम्यान लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील आठवडा हा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर या सत्तासंघर्षाची सुनावणी झाली होती. घटनापीठातील पाच न्यायमूर्तींमधील न्या. एम. आर. शहा 15 मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यांचा निवृत्तीचा दिवस हा सत्कार समारंभाचाच असतो; तर 13 आणि 14 मे रोजी शनिवार व रविवार येत असल्याने येत्या 8 ते 12 मे याच काळात सत्तासंघर्षाचा निकाल लागू शकतो, असे वकीलवर्गात बोलले जात आहे.

कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान आहे. महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याच्या राजकारणाचा निकाल संपूर्ण देशावर परिणाम करणारा असेल. त्यामुळे हा निकाल कर्नाटकच्या मतदानानंतर येतो का? याची उत्सुकता आहे.

Back to top button