Steel Production : देशाच्या पोलाद उत्पादनात चार टक्क्यांची वाढ | पुढारी

Steel Production : देशाच्या पोलाद उत्पादनात चार टक्क्यांची वाढ

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली, दि. 23 : सरत्या आर्थिक वर्षात देशाच्या पोलाद उत्पादनात 4.18 टक्क्यांची वाढ झाली असून 2021-22 च्या 120.29 दशलक्ष टनाच्या तुलनेत संबंधित वर्षात 125.32 दशलक्ष टन इतके पोलाद उत्पादन झाले आहे. पोलाद क्षेत्रातील एका संशोधन संस्थेकडून ही माहिती देण्यात आली.
पोलाद उत्पादनापैकी फिनिश्ड पोलाद उत्पादनाचे प्रमाण 121.29 दशलक्ष टन इतके आहे. हे उत्पादन 113.60 दशलक्ष टनाच्या तुलनेत 6.77 टक्क्याने वाढले आहे. देशातील पोलादाची विक्रीदेखील 12.69 टक्क्याने वाढून 105.75 दशलक्ष टनाच्या तुलनेत 119.17 दशलक्ष टन इतकी झाली आहे.
पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणात सुरु असलेली कामे पोलाद उद्योगासाठी लाभकारक ठरत आहेत. दरम्यान पोलादाची निर्यात 50 टक्क्याने घटून 13.49 दशलक्ष टनाच्या तुलनेत 6.72 दशलक्ष टन इतकी झाली आहे. दुसरीकडे आयात 29 टक्क्याने वाढून 4.67 दशलक्ष टनाच्या तुलनेत 6.02 दशलक्ष टनावर गेली आहे. तर पिग ऑयर्न उत्पादन 6.53 टक्क्याने घटून 6.26 दशलक्ष टनाच्या तुलनेत 5.85 दशलक्ष टन इतके झाले आहे.
हे ही वाचा :

Back to top button