पंतप्रधानांनी शेअर केला दिव्यांग कार्यकर्त्यासह फोटो | पुढारी

पंतप्रधानांनी शेअर केला दिव्यांग कार्यकर्त्यासह फोटो

चेन्नई; वृत्तसंस्था :  पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणा आणि तामिळनाडूच्या दौर्‍यावर होते. तेलंगणामध्ये 11,300 कोटी रुपये आणि तामिळनाडूमध्ये 5,200 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी त्यांनी केली. यादरम्यान चेन्नईत इरोड येथील भाजपचे दिव्यांग कार्यकर्ते थिरू एस. मणिकंदन यांची भेट झाली.

पंतप्रधानांनी मणिकंदनसोबत सेल्फी घेतला. रविवारी स्वत:च्या सोशल मीडिया हँडलवर तो पोस्ट केला. पक्षाचा अभिमानास्पद कार्यकर्ता असे मणिकंदन यांचे वर्णन या पोस्टमधून मोदींनी केले आहे. भाजपचे बूथ अध्यक्ष म्हणून मणिकंदन काम करतात. स्वत:चे दुकान चालवणारे ते एक स्वावलंबी कार्यकर्ते आहेत. मणिकंदन आपल्या कमाईतून एक वाटा पक्षाला देतात, असेही मोदींनी म्हटलेले आहे.

Back to top button