देशाचा कोरोनामुक्तीदर ९८ टक्क्यांच्या घरात | पुढारी

देशाचा कोरोनामुक्तीदर ९८ टक्क्यांच्या घरात

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

देशात हळूहळू कोरोना संसर्गाची लाट ओसारत आहे. शनिवारी तब्बल २१४ दिवसांनी दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत निच्चांकी घट नोंदवण्यात आली. गेल्या एका दिवसात १८ हजार १६६ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, २३ हजार ६२४ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली. दरम्यान, २१४ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला. रविवारी देशाचा कोरोनामुक्तीदर उच्चांकी ९७.९९ टक्के नोंदवण्यात आला.
देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे ३ कोटी ३९ लाख ५३ हजार ४७५ पर्यंत पोहचली आहे. यातील ३ कोटी ३२ लाख ७१ हजार ९१५ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली. तर, २ लाख ३० हजार ९७१ रूग्णांवर उपचार सुरू आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनूसार देशाचा कोरोनासंबंधित दैनंदिन संसर्गदर गेल्या ४१ दिवसांपासून तीन टक्क्यांहून कमी १.४२% नोंदवण्यात आला आहे. तर, आठवड्याचा संसर्गदर १.५७ टक्के नोंदवण्यात आला आहे. देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेतून लसीचे आतापर्यंत ९४ कोटी ७० लाख १० हजार १७५ डोस लावण्यात आले आहेत. शनिवारी दिवसभरात ६६ लाख ८५ हजार ४१५ डोस लावण्यात आले. २१ जून पासून देशात सार्वत्रिक लसीकरणाची सुरूवात करण्यात आली आहे. याअनुषंगाने गेल्या ११० दिवसांपासून देशात ६३ कोटींहून अधिक लसीकरण करण्यात आल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ९५ कोटी ९६ लाख ५८ हजार ३७५ डोस पुरवण्यात आले आहेत. यातील ८ कोटी २८ लाख ७३ हजार ४२५ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.

देशातील संपूर्ण लसीकरणाची स्थिती

श्रेणी संपूर्ण लसीकरण

१) आरोग्य कर्मचारी ९०,०९,२१७
२) फ्रंटलाईन वर्कर्स १,५३,२२,२९०
३) १८ ते ४४ वयोगट १०,०३,९२,९४०
४) ४५ ते ५९ वयोगट ८,२५,२२,४७०
५) ६० वर्षांहून अधिक ५,९२,४७,१००

Back to top button