‘थ्री इडियटस्’फेम खराखुरा रँचो म्हणतो, मी नजरकैदेत | पुढारी

‘थ्री इडियटस्’फेम खराखुरा रँचो म्हणतो, मी नजरकैदेत

लेह, वृत्तसंस्था : लडाखमध्ये पर्यावरणाचा र्‍हास होत असल्याचा आरोप करून त्याच्या निषेधार्थ सोनम वांगचुक उपोषणाला बसले आहेत. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे, असे आरोप वांगचुक यांनी रविवारी केले. वांगचुक यांनी एक व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट केला असून, त्यातून त्यांनी 30 जानेवारीला लडाखमधील अन्य लोकांनी तसेच देशभरातील पर्यावरणप्रेमींनीही एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करावे, असे आवाहन केले आहे.

खादुर्र्ंग दर्रा या ठिकाणी जाऊन आंदोलन करणार होतो. तिथे तापमान उणे 40 डिग्रीपर्यंत घसरते. मला प्रशासनाने त्या ठिकाणी जाऊ दिले नाही. सध्या मला माझ्याच घरात नजरकैद करण्यात आले आहे. मी आहे तेथेच उपोषण सुरू केले आहे, असेही वांगचुक यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

कोण आहेत वांगचुक?

सोनम वांगचुक यांना 2018 मध्ये मॅगसेसे अ‍ॅवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
वांगचुक यांच्या व्यक्तिमत्त्वातून प्रेरणा घेऊन 2009 मध्ये ‘थ्री इडियट्स’ हा चित्रपट आला होता.
रँचो अर्थात फुंगसुक वांगडूचा (सोनम वांगचुक) रोल अभिनेता आमीर खानने केला होता.

Back to top button