

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: देशाच्या स्वातंत्र्यांला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून आठवडाभर चालणार्या 'आझादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमास सोमवारपासून सुरुवात झाली. गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाकडून याअंतर्गत आझादी का अमृतमहोत्सव. कार्यक्रमात सार्वजनिक शौचालय स्वच्छता जनभागीदारी उपक्रम कार्यक्रम राबविला जाणार आहे.
सार्वजनिक शौचालयांची परिस्थिती सुधारण्यासाठी कोणकोणते उपाययोजता येतील.
यावर आठवडाभरात जनतेकडून मते मागविली जाणार आहेत.
आठवडाभर चालणार्या विविध कार्यक्रमाअंतर्गत १ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वच्छ भारत मिशन – शहरी भाग टप्पा २ चे लाँचिंग केले जाईल.
स्वच्छ भारत अभियानाला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाकडून सोमवारी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्ताने स्वच्छता अॅप 2.0 चे तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०२२ चे लाँचिंग करण्यात आले. घरोघरी जाऊन कचरा वेगळा करा अमृत दिवसही साजरा करण्यात आला.
स्वच्छतेच्या दृष्टीने ज्या गृहनिर्माण संस्थांनी चांगली कामगिरी केलेली आहे, त्यांच्यासह झोपडपट्टी विकास प्रशासनांचा गौरव यानिमित्ताने करण्यात आला.
सार्वजनिक शौचालय स्वच्छता जनभागीदारी उपक्रम मंगळवार आणि बुधवारी राबविला जाईल.
त्याअंतर्गत सार्वजनिक शौचालयांची परिस्थिती सुधारण्यासाठी कोणकोणते उपाय योजता येतील, यावर आठवडाभरात जनतेकडून मते मागविली जाणार आहेत.
अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये स्वच्छतामित्र सन्मान अमृत समारंभ ठिकठिकाणी घेतले जाणार आहेत.
स्वच्छतामित्रांशी संवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घेणे तसेच त्यांना कर्जाचे वितरण यावेळी केले जाईल. वेस्ट प्रोसेसिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योगपतींचाही सन्मान यावेळी केला जाणार आहे.
हेही वाचलं का ?