Gold Rate : सोन्याच्या दरात मोठी घसरण, खरेदीची हीच सुवर्णसंधी!
नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सोन्याच्या दरात घसरण सुरुच आहे. सोने (Gold Rate) प्रति तोळा ४६ हजार रुपयांवर आले आहे. गुरुवारी (दि.२३ सप्टेंबर) सोन्याचा प्रति तोळा (१० ग्रॅम) दर ४६,६९४ रुपयांवर होता. हा दर शुक्रवारी (दि.२४ सप्टेंबर) ४२० रुपयांनी कमी होऊन ४६,२७४ रुपयांवर आला. तर चांदीचा दर प्रति किलो ६०,४१० रुपये होता.
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, Gold Rate शुक्रवारी २४ सप्टेंबर रोजी २४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) ४६,२७४ रुपये, २३ कॅरेट सोने ४६,०८९ रुपये, २२ कॅरेट सोने ४२,३८७ रुपये, १८ कॅरेट ३५,१२० रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २७,३९३ रुपये होता.
- Vidya Balan : विद्या बालनची साडी पाहून नेटकरी म्हणाले…
- Gold Rates : सोने १० हजारांनी स्वस्त, दर घसरण्याची ‘ही’ आहेत कारणे
मागील एक वर्षातील सोन्याच्या किमतीवर नजर टाकल्यास गेल्या वर्षी २०२० मध्ये सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर ५६,१९१ रुपयांवर पोहोचला होता. तर सप्टेंबर २०२१ मध्ये सोने ४६ रुपयांपर्यंत खाली आले. सध्याचा दर हा गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी कमी आहे.
डॉलर इंडेक्स एक महिन्याच्या उच्चांकी स्तरावर पोहोचल्याने सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
दरम्यान, सणासुदीच्या काळातच सोन्याचे दर खाली आल्याने सोने खरेदीची सुवर्णसंधी असल्याचे सराफा बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- हाय गर्मी! निया शर्माची ब्लॅक शॉर्ट, कंबरेला चेन आणि… (Video)
- Narendra Modi And Joe Biden : ‘तुमच्यासाठी मीही काही कागदपत्रे आणली आहेत’
सोने सहा आठवड्याच्या निच्चांकी स्तरावर आले आहे. एमसीएक्सवर सोने ४६ हजारांवर व्यवहार करत आहे.
शुद्ध सोने कसे ओळखाल?
सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते.
दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.
हे ही वाचा :
- Apurva Nemlekar : अग शेवंता, सूंदर असावं पण किती…!
- आरोग्य विभाग भरती परीक्षा होणारच! राजेश टोपेंचे स्पष्टीकरण
- Health Department : आरोग्य विभागाची परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलली