Health Department : आरोग्य विभागाची परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलली | पुढारी

Health Department : आरोग्य विभागाची परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलली

मुंबई; पुढारी ऑनलाईन : Recruitments in Health Department : आरोग्य विभागाच्या वर्ग क व ड वर्गातील विविध पदांसाठी दिनांक २५ आणि २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत दिली आहे. ऐनवेळी परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आरोग्य विभागाच्या वर्ग क व ड वर्गातील विविध पदांसाठीच्या आज आणि उद्या होणाऱ्या परीक्षा रद्द कराव्या लागल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. ज्या संस्थेकडे परिक्षेची जबाबदारी सोपवली होती ती संस्था असमर्थ ठरल्याने परीक्षा पुढे ढकलावी लागत असल्याचे टोपे यांनी म्हटले आहे.

सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करुन लवकरच परीक्षा घेण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

आरोग्य विभागातील (Recruitments in Health Department) क व ड वर्गातील रिक्त ६ हजार २०० जागांच्या भरतीसाठी या परीक्षा आयोजित केल्या होत्या. पण ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलल्याने मानसिक त्रास सहन करावा लागल्याच्या प्रतिक्रिया अनेक परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

आरोग्य विभागातील भरतीसाठी आयोजित केलेल्या परिक्षेत हॉल तिकीटामुळे आधीच गोंधळ उडाला होता. आता ऐनवेळी या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

न्यासा ही संस्था असमर्थ ठरल्याने आरोग्य विभागातील भरती परीक्षा पुढे ढकलावी लागत असल्याचे कारण टोपे यांनी दिले आहे.

हे ही वाचा :

Back to top button