‘समाज माध्यमांवर सक्रिय रहा’, पंतप्रधानांच्या राज्यसभा खासदारांना सूचना | पुढारी

'समाज माध्यमांवर सक्रिय रहा', पंतप्रधानांच्या राज्यसभा खासदारांना सूचना

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आज (दि.९) भाजपच्या राज्यसभेतील खासदारांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत चार राज्यातील खासदार उपस्थित होते. पंतप्रधानांनी बैठकीतून खासदारांना मार्गदर्शन करीत काही सूचना दिल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार समाजमाध्यमांवर सक्रिय राहण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत. संसदेत खासदारांच्या उपस्थितीचा प्रश्न देखील नेहमी उपस्थित केला जातो. अशात मोदींनी वरिष्ठ सभागृहातील सदस्यांना १०० टक्के उपस्थिती राहील, याअनुषंगाने प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या आहेत.

थेट लोकांमधून निवडून आले नसले तरी अधिकाधिक लोकांमध्ये मिसळून काम करण्याच्या सूचना देखील पंतप्रधानांनी दिल्याचे कळत आहे. यासोबतच पक्षाची बदनामी होईल, असे वर्तन न करण्याचे आणि कागदपत्रांचा गैरवापर होणार नाही, याची दक्षता घेण्याची महत्वाची सूचना देखील पंतप्रधानांनी खासदारांना दिली आहे. या बैठकीत महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटकमधील जवळपास ३० खासदार उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button