Devendra Fadnavis: आमच्या सरकारच्या काळात अवघ्या २५ ते ३० दिवसात प्रकल्पांना मान्यता- उपमुख्यमंत्री फडणवीस | पुढारी

Devendra Fadnavis: आमच्या सरकारच्या काळात अवघ्या २५ ते ३० दिवसात प्रकल्पांना मान्यता- उपमुख्यमंत्री फडणवीस

पुढारी ऑनलाईन: मविआ सरकारमुळेच गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रात येणारे अनेक प्रकल्प रखडले आहेत. याला सर्वस्वी ठाकरेंच्या नेतृत्वातील मविआ सरकार जबाबदार असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. यानंतर आमच्या सरकारच्या काळात केंद्र सरकारने अवघ्या २५ ते ३० दिवसात प्रकल्पांना मान्यता दिली असल्याचेही ते म्हणाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले.

नुकत्याच दोन प्रकल्पांना नागपूर येथे परवानगी मिळाली आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले, ११ डिसेंबर हा नागपूरकरांसाठी ऐतिहासिक दिवस असणार आहे. नागपूरला आणखी दोन प्रकल्प मिळाले आहेत. यामुळे नागपूरसह महाराष्ट्राच्याही विकासाला गती मिळणार असल्याचे मतही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

श्रद्धा वालकरच्या वडिलांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट

श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर आणि कुटुंबीयांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली. यावेळी भाजपचे नेते माजी खासदार किरिट सोमय्या हे देखील उपस्थित होते. दरम्यान झालेल्या भेटीनंतर लव्हजिहाद कायद्यासंदर्भात विचार असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी श्रद्धाच्या कुटुंबीयांना देखील लवकरच न्याय मिळेल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धाच्या वडिलांना दिले.

Back to top button