Share Market Today | शेअर बाजारात तेजीनंतर घसरण | पुढारी

Share Market Today | शेअर बाजारात तेजीनंतर घसरण

Share Market Today : जागतिक संकेतांच्या जोरावर आज शुक्रवारी (दि.९) भारतीय शेअर बाजारात सुरुवातीच्या व्यवहारात तेजी दिसून आली होती. त्यानंतर शेअर बाजारात घसरण झाली. सेन्सेक्स ३८९ अंकांनी घसरून ६२,१८१ वर बंद झाला तर निफ्टी ११२ अंकांनी खाली येऊन १८,४९६ वर बंद झाला. एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या शेअरची निफ्टीवर सर्वाधिक घसरण झाली. हा शेअर ६.५० टक्क्यांनी घसरून १,०२९ वर बंद झाला. टेक महिंद्रा, इन्फोसिस, विप्रो आणि टीसीएस यांचे शेअर्सही घसरले. नेस्ले इंडिया, सन फार्मा, आयटीसी, डॉ रेड्डीज आणि टायटन या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक वाढले.

अमेरिकेतील तिन्ही प्रमुख निर्देशांकांनी उच्च पातळीवर जाऊन व्यवहार केला. या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारातही काही प्रमाणात तेजी दिसून आली. जपानचा निक्केई १.०७ टक्क्यांनी आणि हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक ०.६६ टक्क्यांनी वाढला. दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि चीनचा शांघाय कंपोझिट अनुक्रमे ०.०३ टक्के आणि ०.००७ टक्क्यांनी घसरला.

एनएसईच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गुरुवारी १,१३१.६७ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ७७२.२९ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. दरम्यान, काल गुरुवारी BSE सेन्सेक्स १६० अंकांनी म्हणजेच ०.२६ टक्क्यांनी वाढून ६२,५७१ वर बंद झाला, तर निफ्टी (NSE) ४९ अंकांनी म्हणजेच ०.२६ टक्क्यांनी वाढून १८,६०९ वर स्थिरावला होता. (Share Market Today)

हे ही वाचा :

Back to top button