Marriage Invitation Card | महाराष्ट्रातील 'ही' अनोखी लग्नपत्रिका व्हायरल, शेअर बाजाराची थीम, पाहुन आश्चर्यचकीत व्हाल! | पुढारी

Marriage Invitation Card | महाराष्ट्रातील 'ही' अनोखी लग्नपत्रिका व्हायरल, शेअर बाजाराची थीम, पाहुन आश्चर्यचकीत व्हाल!

पुढारी ऑनलाईन डेस्क : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. लग्न म्हणजे दोन मनांचं मिलन असते. लग्नसोहळा अविस्मरणीय बनवण्यासाठी लोक अनेक नाविन्यपूर्ण कल्पना आखतात. अशीच एक लग्नपत्रिका (Marriage Invitation Card) सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या लग्नपत्रिकेतील कल्पकता पाहून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. जर तुम्हाला शेअर बाजारातील तांत्रिक शब्दांची माहिती नसेल तर तुम्हाला ही पत्रिका समजून घेण्यास काहीशी अडचण येऊ शकते. ही लग्नपत्रिका शेअर बाजाराच्या अंदाजात तयार करण्यात आली आहे. ज्यांचे लग्न आहे ते जोडपे महाराष्ट्रातील नांदेड येथील राहणारे आहे. वराचे नाव डॉ. संदेश आणि वधूचे नाव डॉ. दिव्या असे आहे.

लग्नपत्रिकेनुसार, नवऱ्या मुलाच्या नावापुढे मेडिसन लिमिटेड आणि नवरीच्या नावापुढे ॲनेस्थेसिया लिमिटेड असे लिहिले आहे. डॉक्टर शेअर बाजाराचे चाहते असल्याचे वाटतात. पत्रिकेवर प्रसिद्ध दिवंगत गुंतवणूदार झुनझुनवाला, वॉरेट बफेट आणि हर्षदयाल मेहता यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. पत्रिकेत पाहुणे मंडळींना गुंतवणूदार तर मित्रमंडळी आणि कुटुंबियांना रिटेल गुंतवणूदार असे म्हटले आहे. लग्नातील सर्व विधी शेअर बाजारातील शब्दांत लिहिले आहेत. लग्न सोहळ्यातील संगीताला रिंगिग बेल, रिस्पेशनला इंटरिम डिव्हिडेंड, सात फेऱ्यांना लिस्टिंग सेरेमनी आणि विवाह स्थळाला स्टॉक एक्सचेंज असे नाव दिले आहे.

आई-वडिलांना प्रमोटर्स म्हटले आहे. लग्नाला विलीनीकरण (merger) म्हटले असून प्रीवेडिंग सोहळ्याचा उल्लेखही शेअर बाजाराच्या अंदाजात केला आहे. ही लग्नपत्रिका जुनी असली तरी आता ती व्हायरल झाली आहे. दोन दिवसांपूर्वी ही पत्रिका इन्स्टाग्रामवर पोस्ट झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात लाईक केली जात आहे. त्यावर मजेशीर कमेंट केल्या जात आहेत. (Marriage Invitation Card)

हे ही वाचा :

Back to top button