Delhi MCD Elections: दिल्ली महापालिका निवडणूक मतदानाला सुरूवात | पुढारी

Delhi MCD Elections: दिल्ली महापालिका निवडणूक मतदानाला सुरूवात

पुढारी ऑनलाईन: दिल्ली महापालिकेच्या निवडणूक मतदानाला आज (रविवार) सकाळपासून सुरूवात झाली आहे. २५० वार्डसाठी हे मतदान होत आहे. संध्याकाळी ५. ३० पर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. या निवडणुकीत १३४९ उमेदवार निवडणूकीच्या मैदानात आहेत. या निवडणूकीचा निकाल ७ डिसेंबरला समोर येणार आहे.

दिल्ली महापालिकेत एकूण जागा २५० जागा आहेत, यामधील ४२ जागा आरक्षित आहेत.  यापूर्वी दिल्लीत 3 महापालिका होत्या. या तिन्ही मनपांवर सध्या भाजपची सत्ता आहे. तर दिल्लीमध्ये आपची सत्ता आहे. मात्र आता केंद्र सरकारने तिन्ही महापालिकांची मिळून १ महापालिका केली आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप, आप आणि कॉंग्रेस या 3 प्रमुख पक्षांमध्ये लढत होत  आहे.

दिल्ली मनपाची स्थापना 1958 मध्ये झाली. 2012 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या कार्यकाळात उत्तर, दक्षिण आणि पूर्व दिल्ली महानगरपालिका असे तीन भाग करण्यात आले होते. परंतु यावर्षी पुन्हा एकदा हे भाग एकत्र करण्यात आले आहेत. दिल्ली एमसीडीमध्ये गेल्या 15 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे मतदान करण्याचे आवाहन

दिल्ली स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आज मतदान होत आहे. महापालिकेत भ्रष्टाचारमुक्त सरकार स्थापन करण्यासाठी मतदान होत आहे. सर्व दिल्लीकरांना माझे आवाहन आहे की, दिल्ली महानगरपालिकेत प्रामाणिक आणि काम करणारे सरकार स्थापन करण्यासाठी आजच मतदान करा. असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत जनतेला आवाहन केले आहे.

हेही वाचा:

Back to top button