Ear hair : हटके रेकॉर्ड … त्यांच्या कानावरील केस हे जगातील सर्वात लांब! | पुढारी

Ear hair : हटके रेकॉर्ड ... त्यांच्या कानावरील केस हे जगातील सर्वात लांब!

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘मूछें हो तो नत्थूलाल जैसी’, हा अमिताभ बच्‍चन यांचा शराबी चित्रपटातील डॉयगॉल तुम्‍हाला आठवत असेल. बहुतांश चित्रपटात झुपकेदार मिशी असलेलं एकतरी पात्र पाहिलं असेल; पण तुम्ही कधी कानाचा सर्वात लांब केस असलेला माणूस पाहिला आहे का? भारतात असा एक व्यक्ती आहे ज्याच्या कानाचे केस हे जगातील सर्वात लांब (Ear hair) आहेत. याची नोंद गिनीज बुक रेकॉर्डमध्ये (Guinness World Records)  झाली आहे. त्या व्यक्तीच नाव आहे एंटनी विक्टर.

७.१२ इंच

Ear hair : तब्बल ७.१२ इंच लांब केस 

भारतातील एंटनी विक्टर हे एक निवृत्त मुख्याध्यापक आहेत. त्‍यांच्‍या कानाच्या केसाची लांबी तब्बल १८.१ सेंटीमीटर म्हणजे ७.१२ इंच आहे. जगभरात कानावरील सर्वाधिक लांब केस त्‍यांच्‍या नावावर आहे. त्यांच्या केसाच्या लांबीची नोंद गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये झाली आहे.  या रेकॉर्डची नोंद २००७ साली झाली होती. हा रेकॉर्ड आजतागायत कोणीही मोडलेलं नाही.

Ear hair
Ear hair

गिनीज गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एंटनी विक्टर यांच्याबद्दल माहिती देत त्यांचे काही फोटो शेअर केले आहेत. या इन्स्टा पोस्टवर सोशल मिडिया युजर्सने भन्नाट कॉमेंट केल्या आहेत. एक युझर म्हणतं आहे,”असा रेकॉर्ड माझ्या नावावर नको”, एकजण म्हणतं आहे, “शानदार केस” तर एकजण म्हणतं आहे,”अनोखा आणि हटके रेकॉर्ड”. एंटनी विक्टर यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा 

Back to top button