

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी कचरा डेपो येथे बांधकाम राडारोडा कचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे बांधकाम राडारोडा विल्हेवाट व धूळ नियंत्रण या विषयावर शहरातील व्यावसायिक व अधिकार्यांची कार्यशाळा घेण्यात आली. बांधकाम राडारोडा कोठेही न टाकता तो पालिकेस दिल्यास त्यापासून पेव्हिंग ब्लॉक व खडी तयार केली जाते. त्यातून प्रदूषणाला आळा बसत आहे.
कार्यशाळेत सी अॅण्ड डी वेस्ट मॅनेजमेंटचे नियम, प्रक्रियेचे प्रकार, शहरातील नियोजन, प्रदूषण आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सीएसईच्या रजनीश सरीन व मिताशी सिंह यांनी प्रकल्पाची माहिती दिली. या वेळी शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे व कार्यकारी अभियंता, अधिकारी, बांधकाम व्यावसायिकांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.