Heavy rainfall in Delhi : मुसळधार पावसाने दिल्लीला पुन्हा झोडपले | पुढारी

Heavy rainfall in Delhi : मुसळधार पावसाने दिल्लीला पुन्हा झोडपले

पुढारी वृत्तसेवा; नवी दिल्ली: (Heavy rainfall in Delhi) देशाची राजधानी दिल्लीमध्ये गेल्याच आठवड्यात रेकॉर्डब्रेक पाऊस झाला होता. त्यापाठोपाठ आता गुरुवारी पावसाने दिल्लीकरांना झोडपून काढले आहे. दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. पावसामुळे सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले होते तर प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. (Heavy rainfall in Delhi)

दिल्लीमध्ये सप्टेंबर महिन्यातच नव्हे तर संपूर्ण मॉन्सूनच्या कालावधीत विक्रमी पाऊस पडलेला आहे. उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही जोरदार पाऊस सुरु असल्याने यमुना नदीला पूर आला आहे. दिल्लीतील यमुनेची पाणी पातळी झपाटय़ाने वाढली आहे. गुरुवारी सकाळी ही पातळी धोकादायक स्तरावर होती.

पुढील काही दिवस उत्तर तसेच मध्य भारतात मोठा पाऊस पडण्याचा अंदाज अलीकडेच हवामान खात्याने वर्तवला होता. विशेषतः मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरात आणि राजस्थानच्या पूर्व भागात अतिपावसाचा अंदाज आहे. हरियाणामध्ये 17 आणि 18 तारखेला जोरदार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आलेली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पूर्व भारतात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विशेषतः ओडिशा आणि पश्चिम बंगालसाठी हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचलं का ?

 

 

 

Back to top button