तिरुपती देवस्‍थान ट्रस्‍ट सदस्‍यपदी मिलिंद नार्वेकर यांची नियुक्‍ती | पुढारी

तिरुपती देवस्‍थान ट्रस्‍ट सदस्‍यपदी मिलिंद नार्वेकर यांची नियुक्‍ती

विजयवाडा ;पुढारी ऑनलाईन : देशातील सर्वात श्रीमंत देवस्‍थान अशी ओळख असणार्‍या तिरुमला तिरुपती देवस्‍थान ट्रस्‍टच्‍या सदस्‍यपदी देशभरातून २४ सदस्‍यांची नियुक्‍ती केली जाते. तिरुमला तिरुपती देवस्‍थान ट्रस्‍टच्‍या सदस्‍यपदी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची निवड झाली आहे.

मुख्‍यमंत्री उद्‍धव ठाकरेंकडून शिफारस

आंध्र प्रदेशमधील तिरुपती देवस्‍थानने बुधवारी नव्‍या मंडळाची स्‍थापना केली असून, यामध्‍ये एकुण २८ सदस्‍यांचा समावेश आहे. यात देशभरातील २४ सदस्‍यांचा समावेश आहे. मुख्‍यमंत्री उद्‍धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्‍यमंत्री जगनमोहन रेड्‍डी यांच्‍याकडे मिलिंद नार्वेकर यांच्‍या नियुक्‍तीसाठी शिफारस केल्‍याचे समजते.

नार्वेकर सध्‍या मुंबई क्रिकेट संघटनेच्‍या मुंबई प्रीमिअर लीगच्‍या गव्‍हर्निंग कौन्‍सिलच्‍या अध्‍यक्षपदाची जबाबदारी आहे.

तिरुमला तिरुपती देवस्‍थान ट्रस्‍ट बोर्ड अध्‍यक्षपदी आंध्र प्रदेशचे वाय व्‍ही रेड्‍डी यांच्‍याकडे सलग दुसर्‍या वर्षीही कायम राहिले आहे.

या मंडळाच्‍या सदस्‍यपदासाठी प्रत्‍येक राज्‍याचे मुख्‍यमंत्री  आपल्‍या राज्‍यातून होणार्‍या संबंधितांच्‍या नावाची आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करतात.

मुख्‍यमंत्री उद्‍धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्‍यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे अध्‍यक्ष जगनमोहन रेड्‍डी यांच्‍याशी फोनवर संवाद साधला. यावेळी त्‍यांनी मिलिंद नार्वेकर यांच्‍या नावाची शिफारस केल्‍याचे समजते.

हेही वाचलं का ? 

 

 

Back to top button