नितीन गडकरी यांची कार्यक्रमातच तब्येत बिघडली; तत्काळ उपचार | पुढारी

नितीन गडकरी यांची कार्यक्रमातच तब्येत बिघडली; तत्काळ उपचार

सिलीगुडी वृत्तसंस्था :  तीन महामार्गांचे उद्घाटन आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमस्थळी रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांची गुरुवारी प्रकृती अचानक बिघडली. त्यांची शुगर कमी झाल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. आता त्यांची प्रकृती ठीक आहे.

गडकरी गुरुवारी बंगालच्या दौर्‍यावर होते. सिलीगुडी येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या 1,206 कोटी रुपयांच्या तीन प्रकल्पांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमातच त्यांना अस्वस्थ वाटू लागले व तब्येत अचानक बिघडली. सुकना आरोग्य केंद्राच्या पथकाने तातडीने धाव घेत तपासणी केली. गडकरी यांची शुगर कमी झाल्याने त्यांना हा त्रास झाला. त्यांच्यावर तेथेच उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना बरे वाटू लागले. ताजेतवाने झाल्यावर त्यांनी कार्यक्रम पूर्ण केला. कार्यक्रमातच तब्येत बिघडण्याचा प्रकार गडकरी यांच्या बाबतीत याआधीही घडला आहे. राहुरी येथे एका कार्यक्रमात त्यांना स्टेजवरच भोवळ आली होती. तेव्हा तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांनीच त्यांना सावरले होते.

Back to top button