Gyanvapi Case : ज्ञानवापीत मिळालेल्या शिवलिंगाच्या संरक्षणावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी | पुढारी

Gyanvapi Case : ज्ञानवापीत मिळालेल्या शिवलिंगाच्या संरक्षणावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

पुढारी ऑनलाइन डेस्क : Gyanvapi Case : वाराणसीतील ज्ञानवापीत मशिदीच्या मिळालेल्या परिसरात शिवलिंगाच्या संरक्षणाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय उद्या शुक्रवारी दुपारी तीन वाजता सुनावणी घेण्यात येणार आहे. वाराणसी येथील ज्ञानवापी काशी विश्वनाथ प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी खंडपीठ स्थापन केले जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाकडून गुरुवारी सांगण्यात आले. शिवलिंग क्षेत्र संरक्षित ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश 12 नोव्हेंबरला संपत आहे. या पार्श्वभूमीवर ज्ञानवापी परिसरातील शिवलिंगाच्या सुरक्षेशी संबंधित याचिकेवर शुक्रवारी दुपारी तीन वाजता सुनावणी घेतली जाईल तसेच यासाठी एका खंडपीठाची स्थापना केले जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले.

Gyanvapi Case : पुरातत्व खात्याच्या सर्वेक्षणात ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा करत हिंदू पक्षकारांनी याचे संरक्षण करण्यात यावे अशी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने वाराणसीतील जिल्हा मॅजिस्ट्रेटला हे सुनिश्चित करण्यासाठीचे निर्देश दिले होते की दाव्यानुसार मशिदीत ज्या जागी शिवलिंग मिळाले आहे त्याला सुरक्षित ठेवावे.

Gyanvapi Case : सोबतच यामुळे मुसलमानांच्या नमाज पडण्याचा अधिकार प्रभावित होणार नाही याची दक्षता घेण्याचेही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांना ज्ञानवापी मशिदीच्या अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीच्या अर्जावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. समितीने म्हटले होते की, ज्ञानवापी हा खटला प्रार्थनास्थळे (विशेष तरतुदी) कायद्यांतर्गत दाखल करता येणार नाही.

हे ही वाचा :

मालदीवध्ये अग्नितांडव! भीषण आगीत ९ भारतीयांसह १० जणांचा होरपळून मृत्यू

Gujrat Election : ‘आम्ही नक्की जिंकू’ ; गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच केजरीवालांचा दावा

Back to top button