Gujrat Election : ‘आम्ही नक्की जिंकू’ ; गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच केजरीवालांचा दावा | पुढारी

Gujrat Election : 'आम्ही नक्की जिंकू' ; गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच केजरीवालांचा दावा

पुढारी ऑनलाईन डेस्क : निवडणूक आयोगाकडून गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. गुजरात विधानसभेसाठी १ आणि ५ डिसेंबर असे दोन टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. तर ८ डिसेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणूकीची घोषणा होताचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत ही निवडणूक ‘आम्ही नक्की जिंकू’, असे म्हटले आहे. (Gujrat Election)

आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी गुजरातच्या जनतेसाठी एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये केजरीवाल गुजराती भाषेत बोलले आहेत. अरविंद केजरीवाल गुजराती भाषेत म्हणाले, ‘कसे आहात तुम्ही? तुम्ही मला आपला भाऊ मानता ना? आपल्या कुटुंबाचा सदस्य मानता ना? माझ्यावरील प्रेमासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद. (Gujrat Election)

मी तुम्हाला वचन देतो की, तुमच्या भावाप्रमाणे तुमच्या कुटुंबाची जबाबदारी संभाळेल. मी तुमची महागाईपासून मुक्तता करेल. मोफत वीज देईल. तुमच्या मुलांसाठी चांगल्या शाळा बांधेल. तुमच्या कुटुंबीयांवर उपचार करण्यासाठी हॉस्पीटल बांधेल. सोबतचं तुमच्या मुलांसाठी रोजगारही उपलब्ध करून देईल. तुम्हाला रामाच्या दर्शनासाठी अयोध्येला घेऊन जाईल. यासाठी आम आदमी पक्षाला एकदा संधी द्या, असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी व्हिडिओमध्ये म्हणाले. (Gujrat Election)

आम आदमी पक्षाचे मुख्य प्रवक्ता सौरभ भारद्वाज गुजरात निवडणूकीबाबत म्हणाले, आम्ही ९० ते ९५ जागा जिंकणार आहोत. यावेळेस गुजरातची जनता परिवर्तनासाठी मतदान करणार आहे. लोक २७ वर्षांपासून सत्तेत असलेल्या पक्षाल कंटाळले आहेत. (Gujrat Election)

हेही वाचलंत का?

Back to top button