Polluted air : प्रदूषित हवेबाबत सध्या संपूर्ण जगात भारताने गाठली सर्वोच्च पातळी | पुढारी

Polluted air : प्रदूषित हवेबाबत सध्या संपूर्ण जगात भारताने गाठली सर्वोच्च पातळी

पुढारी ऑनलाइन डेस्क : Polluted air : दिल्ली सध्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. दिल्लीत प्रदूषण वाढल्याने प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे तर 50 टक्के सरकारी कर्मचारी घरातून काम करतील असा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीतील एक्यूआईने अतिशय धोकादायक पातळी गाठली आहे. तर आकडेवारी पाहिल्यास हवा प्रदूषणाच्या बाबतीत भारतातील सध्या शहरांनी जगात सर्वोच्च पातळी गाठली आहे. भारताच्या अनेक शहरांमध्ये आज सकाळी एक्यूआय 500 पर्यंत पोहोचला होता.

Polluted air : अमर उजालाने या संबंधीचे वृत्त दिले आहे. त्यात म्हटले आहे की, संपूर्ण जगात हवेची खराब गुणवत्ता असलेल्या देशांमध्ये भारत सर्वात टॉपवर आहे. इथे आकडेवारीनुसार साधारण एक्यूआय 500 पेक्षा अधिक आहे. जगातील सर्वात टॉप प्रदूषित शहरात भारतातील चार शहरांचा समावेश आहे. या शहरांमध्ये एक्यूआय (एयर क्वालिटी इंडेक्स) हा सातत्याने हानिकारक स्तरावर पोहोचला आहे. दिल्लीतील वेगवेगळ्या भागात एक्यूआय 500 ते 700 च्या दरम्यान आहे. नॉएडामध्ये एक्यूआय 519 तर फरीदाबादमध्ये 515 आणि गाजीयाबादमध्ये 493 वर आहे.

Polluted air : प्रदूषित हवा असलेल्या देशांमध्ये दूसरा नंबर चीनचा लागतो. इथे फक्त बाओंडिगचेच एक्यूआय 500 आहे ते सोडले तर अन्य कोणत्याही शहराचा एक्यूआय 200 पेक्षा जास्त नाही. तर भारताचा अन्य शेजारील देश बांग्लादेशातील शहरात 170 एक्यूआयसह जगातील चौथा सर्वात प्रदूषित शहर आहे. पलटन आणि ढाका ही बांग्लादेशातील सर्वात खराब हवा असलेली शहरे आहेत. मात्र, तिथेही एक्यूआय 200 च्या पलिकडे गेलेला नाही. बांग्लादेशनंतर पाकिस्तान पाचव्या क्रमांकावर येतो. जिथे सरासरी एक्यूआय 157 वर गेला आहे. सध्या लाहोरचा एक्यूआय 480 आहे. तर शरकपूर शरीफ चा एक्यूआय 247 आहे. अन्य शहरात हा आकडा 200 च्या खाली आहे.

Polluted air : भारतात सर्वात जास्त प्रदुषित हवा असलेल्या टॉप-10 शहरात दिल्ली-एनसीआय व्यतिरिक्त बिहारमधील कटिहार आणि आरा यांचा देखिल समावेश आहे. इथे एक्यूआय क्रमश: 350 आणि 448 इतके आहे. याशिवाय मध्यप्रेदशची राजधानी भोपाल 468, हरियाणातील सिरसा 412 एक्यूआय इतकी नोंदणी झाली आहे.

हे ही वाचा :

प्रदुषणामुळे दिल्लीचा श्वास गुदमरला, प्राथमिक शाळा बंदचा केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय

आशियातील १० प्रदुषित शहरांमध्ये दिल्लीचा समावेश नाही; केजरीवाल यांचा दावा

Back to top button