प्रदुषणामुळे दिल्लीचा श्वास गुदमरला, प्राथमिक शाळा बंदचा केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय

प्रदुषणामुळे दिल्लीचा श्वास गुदमरला, प्राथमिक शाळा बंदचा केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा; दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत पोहोचली आहे. थंडीचे दिवस जसजसे जवळ येत चालले आहेत, तसतशी हवा जास्तच विषारी बनत चालली आहे. हवामान गुणवत्ता ढासळल्यामुळे केजरीवाल सरकारने दिल्लीतील प्राथमिक शाळा उद्यापासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत हवामानाची गुणवत्ता सुधारत नाहीत, तोपर्यंत दिल्लीतील या प्राथमिक शाळा बंद राहणार असल्याचे देखील केजरीवाल सरकारने म्हटले आहे.

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी (दि.०४) सकाळी हवा गुणवत्ता निर्देशांक ४८९ वर गेला होता. दुसरीकडे नोएडा येथे हाच निर्देशांक ५६२ वर गेला होता. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत जीआरएपी – ४ श्रेणीचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मागील चोवीस तासात दिल्लीचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ४५० च्या वर नोंदवला गेला होता. एक्यूआय चारशेच्या वर असेल तर हवा अतिशय खराब असल्याचे समजले जाते.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील आनंद विहार येथे ४७३ एक्यूआय नोंदवला गेला. याशिवाय आयटीओ येथे ४४४, गाझियाबादमधील इंदिरापुरम येथे ४११, नोएडा सेक्टर १२५ येथे ३७७, गुरूग्राममधील टेरी ग्राम स्टेशन येथे ४९३ एक्यूआय नोंदवला गेला. दरम्यान वाढत्या प्रदूषणामुळे नोएडा येथे ८ नोव्हेंबरपर्यंत पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ऑनलाइन माध्यमातून चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news