देशातील वीज मागणीत ऑगस्ट महिन्यात वाढ | पुढारी

देशातील वीज मागणीत ऑगस्ट महिन्यात वाढ

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशातील विजेच्या मागणीत वाढ झाल्याने वीज निर्मिती केंद्रांना ऑगस्ट महिन्यात ५४.०९ मेट्रिक टन कोळसा पुरवण्यात आला. ऑगस्ट २०२१ मध्ये हे प्रमाण ४८.८० टक्के होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १०.८४ टक्क्यांनी अधिक कोळशाचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती कोळसा मंत्रालयाने दिली आहे.

ऑगस्ट महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत ३.१४ टक्क्यांनी अधिक वीज निर्मिती करण्यात आली. परंतु, जुलै महिन्यात झालेल्या ८६,०३४९ मेगाव्हॅट च्या तुलनेत ऑगस्टमध्ये ८५,७८५ मेगा व्हॅटच वीजनिर्मिती झाली असून त्यात ०.३० टक्के नकारात्मक वाढ नोंदवण्यात आली आहे.

देशातील एकूण कोळसा उत्पादन ऑगस्ट २०२१ च्या ५१.६२ मेट्रिक टनाच्या तुलनेत ऑगस्ट २०२२ मध्ये ८.२७ टक्क्यांनी वाढून ५८.३३ दशलक्ष टनापर्यंत पोहोचले आहे. देशातील प्रमुख ३७ कोळसा उत्पादक खाणींपैकी २५ खाणींनी १०० टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादन घेतले, तर इतर पाच खाणींचे उत्पादन ८० ते १०० टक्क्यांच्या दरम्यान राहिल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. कोळसा खाणींकडून करण्यात येणारा कोळसा पुरवठा ऑगस्ट २०२१ मधील ६०.१८ मेट्रिक टनाच्या तुलनेत ऑगस्ट २०२२ मध्ये ५.४१ टक्क्यांनी वाढून ६३.४३ मेट्रिक टन झाले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button