सोनाली फोगाट खूनप्रकरण : बहीण, भावोजीकडून ठार मारण्याची धमकी | पुढारी

सोनाली फोगाट खूनप्रकरण : बहीण, भावोजीकडून ठार मारण्याची धमकी

पणजी ः पुढारी वृत्तसेवा अभिनेत्री आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट यांना बहीण, भावोजीने ठार मारण्याची धमकी दिल्याची माहिती उघड झालेली आहे. हरियानातील फतेहाबाद पोलिस स्थानकात दाखल या तक्रारीनुसार प्रकरणी सोनाली यांनी 29 ऑक्टोबर 2019 रोजी आपली बहीण रुकेशा पुनिया आणि भावोजी अमन पुनिया यांच्याविरोधात आपणास जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार फोगाट यांनी पोलिसांत दाखल केली होती.

आदमपूर विधानसभा निवडणुकीच्या काळातील ही घटना आहे. फोगाट यांच्या तक्रारीनुसार त्या दोघांनी तिला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच तिला जिवे मारण्याची धमकी दिली.
पोलिसांनी तिची बहीण व भावोजी विरोधात 28 नोव्हेंबर 2019 रोजी आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर तक्रारदाराला हे प्रकरण पुढे नेण्यास रस नसल्यामुळे 21 फेब्रुवारी 2022 रोजी न्यायालयात खटला रद्द करण्याचा अहवाल दाखल केला आणि 28 फेब्रुवारी 2022 रोजी
खटला रद्द करण्यात आला.

दरम्यान, सोमवारीी गोवा पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी एका वृत्तवाहिनीशी सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणाबाबत संवाद साधला. त्यांनी सांगितले की, याप्रकरणी योग्य तपास करून खर्‍या दोषीपर्यंत पोहोचण्यास गोवा पोलिस सक्षम आहेत. हरियाणा येथे गेलेले गोवा पोलिसांचे पोलिस पथक सोनाली फोगाट यांच्या मालमत्तांबाबत तपास करत आहे. हे पथक सोनाली याच्या रोहटक येथील घरीही पोचले आहे.

गोवा पोलिसांनी याप्रकरणी सोनाली फोगाट यांचे स्वीय साहाय्यक सुधीर सांगवान, मित्र सुखविंदर सिंग व इतर तिघांना अटक केली आहे. गोवा पोलिसांनी काल दि. 4 रोजी सुधीर सांगवान याच्या घरी तपास केला. सांगवानचा गुरुग्राममधील फ्लॅटचीही तपासणी पोलिसांनी केली आहे. तेथे काही दागिने व रोख ताब्यात घेतली आहे.

हरियाणामधून गोवा पोलिसांचे पथक माघारी आल्यानंतर आम्ही एका ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचू, असे उत्तर सोनाली फोगाट यांच्या बहिणीने केलेल्या सीबीआय तपासाच्या मागणीवर सिंग यांनी दिलेफार्म हाऊस हवे होते भाड्याने
सोनाली फोगाट यांचे धानधूर गावात फार्म हाऊस आहे. ते फार्म हाऊस सांगवान याला दहा वर्षांसाठी करारावर हवे होते. त्यासाठी त्याने ऑनलाईन अर्जही केला होता. ते लिज डीड प्रत्यक्षात होऊ शकले नव्हते. सोनालीचा खून झाल्यानंतर गोवा पोलिस मालमत्तेच्याच दृष्टिकोनातून याबाबत अधिक चौकशी करत आहेत.

Back to top button