एस. जयशंकर म्हणाले, "भारत अफगाण नागरिकांच्या सोबत उभा"

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : अफगाणिस्तानातील सध्या परिस्थितीवर सर्वपक्षीय बैठक पार पाडली. त्या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांना अफगाणिस्तानमधील सध्यस्थिती सांगितली. अफगाणिस्तानात फसलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांना सर्वांना दिली. तसेच या संकटकाली भारत अफगाणिस्तानच्या नागरिकांच्या सोबत आहे, असंही एस. जयशंकर यांनी सांगितले.

सूत्रांच्या माहितीनुसार या सर्वपक्षीय बैठकीत सांगण्यात आले की, सध्या अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सर्वोच्च प्राथमिकता देण्यात आली आहे. सुमारे १५ हजार लोकांनी सरकारला मदत मागितली आहे. त्याचबरोबर या बैठकीत अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर अमेरिका, चीन आणि रशिया यांच्या भूमिका काय आहे, याचीही कल्पना दिली आहे.

या सर्वपक्षीय बैठकीत सरकारतर्फे ६ मंत्र्यांनी भाग घेतला. त्यात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, परराष्ट्र राज्यमंत्री मिनाक्षी लेखी, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, वाणिज्य मंत्री पियूष गोयल, तसेच केंद्रीय मुरलीधरण आणि अर्जुन मेघवाल सहभागी झाले होते.

विरोधी पक्षातील एनसीपीचे शरद पवार, तृणमूल काॅंग्रेसकडून शुभेंदू शेखर राॅय आण साॅगत राॅय, डीएमके तिरुची शिवा, आरजेडीचे प्रेमचंद गुप्ता, एमआयएमचे असदुद्दीन औवेसी, आम आदमी पार्टीचे एनडी गुप्ता, टीडीपीचे जयदेव गल्ला, जेडीएसचे एचडी देवेगौडा, जेडीयूचे ललन सिंह, बीजेडीचे प्रसन्ना आचार्य, सीपीआयचे बिनाॅय विश्वम उपस्थित होते.

पहा व्हिडीओ : अफगाणिस्तान : काबूल विमानतळावर उडत्या विमानातून तिघेजण कोसळले

https://www.youtube.com/watch?v=0C9F33TFAhc&t=26s

Exit mobile version