कोरोनाचा मोठा विस्फोट! देशात २४ तासांत ३ लाख ८६ हजारांवर रुग्ण, ३,४९८ मृत्यू | पुढारी

कोरोनाचा मोठा विस्फोट! देशात २४ तासांत ३ लाख ८६ हजारांवर रुग्ण, ३,४९८ मृत्यू

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशात कोरोनाचा विस्फोट सुरुच आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवीन ३ लाख ८६ हजार ४५२ रुग्ण आढळून आले आहेत. तर साडेतीन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसातील मृतांचा हा आकडा चिंता वाढवणारा आहे. 

वाचा : ड्राय स्वॅब तंत्राने कोरोना चाचणी अहवाल ४ तासांत

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत पावणेचार लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ हजार ४९८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील मृतांचा एकूण आकडा २ लाख ८ हजार ३३० वर पोहोचला आहे.

देशात आतापर्यंत १ कोटी ८७ लाख ६२ हजार ९७६ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यातील १ कोटी ५३ लाख ८४ हजार ४१८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात ३१ लाख ७० हजार २२८ सक्रिय रुग्ण आहेत.  

वाचा : कडकडीत लॉकडाऊनची वेळ आलीय

गेल्या महिन्याभरात देशात कोरोनाने डोके वर काढल्याने कोरोनाबाधितांसाह कोरोना मृत्यूचा आकडा वाढत आहे. दररोज ३ हजारांहून अधिक मृत्यू होत आहेत. अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने रुग्णांना प्राण गमवावा लागत आहे.

Back to top button