रेमडेसिवीरच्या साडेचार लाख कुप्यांची आयात करण्याचा निर्णय | पुढारी

रेमडेसिवीरच्या साडेचार लाख कुप्यांची आयात करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

कोरोना संसर्गाच्या गंभीर रुग्णांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या रेमडेसिवीर या औषधाची आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी या औषधाच्या साडेचार लाख कुप्या आयात केल्या जाणार असून त्यापैकी ७५ हजार कुप्या गुरूवारी दाखल झाल्या.

अधिक वाचा : ‘सोशल मीडियातून वैद्यकीय मदत मागणाऱ्यांवर कारवाई केल्यास न्यायालयाचा अवमान समजला जाईल’!

भारत सरकारच्या मालकीच्या एचएलएल लाइफ केअर लिमिटेड या कंपनीने अमेरिकेतील मेसर्स गिलियड सायन्सेस आणि इजिप्शियन औषध कंपनी मेसर्स ईवा फार्माकडून रेमडेसिवीरच्या ४,५०,००० व्हायल मागवल्या आहेत. अमेरिकेतील गिलियड सायन्सेस पुढील एक ते दोन दिवसांत ७५,००० ते १,००,००० कुप्या पाठविणार आहे. त्याचप्रमाणे १५ मे पर्यंत आणखी एक लाख कुप्या सदर कंपनीकडून प्राप्त होणार आहेत. ईवा फार्मातर्फे सुरुवातीला सुमारे १० हजार कुप्या आणि यानंतर दर १५ दिवसांनी जुलैपर्यंत ५० हजार कुप्या प्राप्त होणार आहेत.

अधिक वाचा : कोरोना पार्श्वभूमीवर मेडिक्लेमसाठी कोणते पर्याय आहेत?

सरकारने देशातील रेमडेसिविरची उत्पादन क्षमता वाढविली आहे. देशांतर्गत सात परवानाधारक उत्पादकांची उत्पादन क्षमता दरमहा ३८ लाख वायलवरून वाढून १.०३ कोटी वायल झाली आहे. गेल्या सात दिवसात (२१-२८ एप्रिल, २०२१) औषध कंपन्यांनी देशभरात एकूण १३.७३ लाख व्हायलचा पुरवठा केला आहे. ११ एप्रिल रोजी दररोज ६७,९०० व्हायल इतका पुरवठा होत होता. यात वृद्धी होऊन २८ एप्रिल २०२१ रोजी हा आकडा २.०९ लाख वायल इतका झाला. रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य व केंद्रशासित प्रदेशांना सल्ले-सूचना जारी केल्या आहेत. 

अधिक वाचा : मरणानंतरही जागा मिळेना! दिल्लीत कोरोनामुळे दगावलेल्यांवर प्राण्यांच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

भारतात रेमडेसिवीरची उपलब्धता वाढविण्यासाठी सरकारने त्याच्या निर्यातीवरही बंदी घातली आहे. सर्वसामान्य जनतेत हे इंजेक्शन परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावे हे सुनिश्चित करण्यासाठी एनपीपीएने १७ एप्रिलला सुधारित किरकोळ किंमत जाहीर करत सर्व प्रमुख ब्रँडची किंमत प्रति कुपी ३५०० रुपयांपेक्षाही कमी करण्यात आले आहेत.

Back to top button