कोरोना केसेस आणि लसीचा आलेख शेअर करत राहुल म्हणाले, ‘मोदी है तो मुमकीन है’! | पुढारी

कोरोना केसेस आणि लसीचा आलेख शेअर करत राहुल म्हणाले, 'मोदी है तो मुमकीन है'!

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या अभूतपूर्व हाहाकार केला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेकांना मरणयातना सहन कराव्या लागत असल्याचे दुर्दैवी चित्र सातत्याने समोर येत आहे. कोरोना विरोधातील प्रमुख अस्त्र असलेल्या लसीकरणाचाही पुरता फज्जा उडाला आहे. त्यामुळे परिस्थिती दिवसागणिक चिंताजनक होत चालली आहे. 

अधिक वाचा : सर्वोच्च न्यायालयाकडून ऑक्सिजन, औषधांच्या वितरणासाठी १२ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना

या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियात व्हिडिओ शेअर करत कडाडून प्रहार केला आहे. त्यांनी अत्यंत वेगाने वाढत चाललेल्या कोरोना केसेस आणि तुलनेत धीम्या गतीने होत चाललेल्या लसीकरणाचा आलेख ग्राफिक व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत मोदी है तो मुमकीन है असे नाव दिले आहे. त्यांनी व्हिडिओ शेअर करताना मोविड पॅनडेमिक अशी कॅप्शन दिली आहे. 

अधिक वाचा : सीएम ममतांकडून पोलिस खात्याची झाडाझडती!

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच असून मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे.  देशभरात गेल्या २४ तासांत ४,०१,०४८ इतके नवे रुग्ण आढळले असून ४,१८७ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या लॉकडाऊननंतरही थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याचे चित्र आहे. 

अधिक वाचा : रुग्णालयात दाखल होण्यासाठी कोरोना रिपोर्टचे नियम बदलले! काय आहे नवीन नियमावली?

देशात प्रत्येक राज्याने रुग्णसंख्या पाहून ठिकठिकाणी विकेंड लॉकडाऊन आणि अन्य उपाययोजना राबविल्या आहेत. मात्र, त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. गेल्या तीन दिवसांपासून रुग्णांचा आकडा सतत वाढत असून गेले तीन दिवस २४ तासांत चार लाखांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. उपचाराअभावी मृत्यूचे प्रमाणही वाढत असून गेल्या २४ तासांत चार हजार १८७ रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. ३,१८, ६०९ रुग्णांचा डिस्चार्ज झाला असून नव्या रुग्णांच्या तुलनेत हा आकडा खूपच कमी आहे. 

अधिक वाचा : ‘देशातील १८० जिल्ह्यात आठवडाभरापासून कोरोनाचा एकही रूग्ण नाही’

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत ही बाब समोर आली असून ही आकडेवारी देशाची काळजी वाढविणारी आहे. गेल्या २४ तासांतील नव्या रुग्णांमुळे सध्या देशातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २ कोटी, १८ लाख ९२ हजार ६७६ झाली आहे. तर आत्तापर्यंत २ लाख, ३८ हजार २७० जणांना प्राण गमवावे लागले आहेत.  

Back to top button