लॉकडाऊन लावा, झोपेतून जागे व्हा; इंडियन मेडिकल असोसिएशनचे केंद्र सरकारला खडे बोल | पुढारी

लॉकडाऊन लावा, झोपेतून जागे व्हा; इंडियन मेडिकल असोसिएशनचे केंद्र सरकारला खडे बोल

नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन 

‘कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्याराज्यांमध्ये लावण्यात आलेला लॉकडाऊन पुरेसा नाही, त्यामुळे झोपेतून जागे व्हा,’ असे खडे बोल सुनावत इंडियन मेडिकल असोसिएशनने केंद्र सरकार आणि केद्रीय आरोग्य मंत्रालयावर टीका केली आहे. 

वाचा : पीएम मोदी, अमित शहांना बदलावे लागेल; शिवसेनेची टीका

कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता इंडियन मेडिकल असोसिएशनने केंद्र सरकारला राष्ट्रीय लॉकडाऊन करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्याकडे ढुंकूनही न पाहता ‘लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे’ असे म्हणत हा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुडकावला. त्यामुळे आयएमएने एक प्रसिद्धीपत्रक काढलं असून, केंद्र सरकारच्या धोरणावर कडक टीका केली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांनी आणि सहकाऱ्यांनी केंद्र सरकारला करोनाचा प्रसार रोखण्यासाठी काही सल्ला दिला होता. मात्र, तो सरकारने तो सल्ला कचराकुंडीत फेकला, असा आरोप संघटनेने केला.

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून जे काही निर्णय घेतले जात आहे. त्यांचा वस्तुस्थितीशी काहीही संबंध नाही. उच्चपदस्थ लोक स्थानिक पातळीवरील परिस्थिती समजून घ्यायलाच तयार नाहीत. नियोजनबद्ध पद्धतीने देशात लॉकडाउन लागू करण्याची विनंती संघटना मागील २० दिवसांपासून केंद्र सरकारकडे करत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या लॉकडाउनने काहीही होणार नाही. वेगवेगळी राज्ये आपापल्या पद्धतीने लॉकडाउन करत आहेत. पण, याचा कोणताही फायदा होणार नाही. संघटनेनं लॉकडाउनसंदर्भात दिलेला प्रस्ताव केंद्र सरकारने कचराकुंडीत फेकला.

वाचा : कोरोनाची दुसरी लाट जुलैपर्यंत संपणार; तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये 

लॉकडाऊन आणि आरोग्य सुविधांवरून ‘झोपेतून जागे व्हा आणि करोना काळात उभ्या राहणाऱ्या समस्यांना तोंड द्या’ असे सुनावले आहे. आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करावी. उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकांना वेळ आणि सुविधा दिल्या जाव्यात, जेणेकरून ते वाढत्या रुग्णसंख्येला योग्य पद्धतीने हाताळतील. त्यामुळे करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासही मदत होईल. त्याचबरोबर केंद्र सरकारने लसीकरणाची प्रक्रिया इतक्या उशिराने का सुरू केली? सर्वांपर्यंत लस पोहोचेल अशा पद्धतीने लसींचं वाटप का केलं गेलं नाही? लशींचे दर वेगवेगळे का ठेवले? हे अनाकलनीय आहे. असेही पत्रकात म्हटले आहे. 

वाचा : एक ऑगस्टपर्यंत देशात कोरोनाने १० लाख मृत्यू

 

Back to top button